माजी दिग्गजाने सांगितली विराटला फाॅर्ममध्ये आणण्याची ट्रिक! म्हणाला, “त्याला सांगा पाकिस्तानविरूद्ध…”
Marathi January 14, 2025 12:24 AM

भारत-ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेल्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत दिग्गज फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) कामगिरी निराशाजनक होती. विराटने या मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक झळकावले, परंतु त्यानंतर तो खराब फॉर्ममुळे संघर्ष करत राहिला. यासोबतच विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल सतत अटकळ बांधली जात आहे. मात्र, आता माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर मोठे विधान केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) आमने-सामने येतील असा विश्वास पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरला आहे. विराटला पाकिस्तानविरूद्ध खेळायला आवडते. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी विराट फॉर्ममध्ये परतेल. असे त्याचे मत आहे.

स्पोर्ट्स तकशी झालेल्या संभाषणात शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला की, “भारत-पाकिस्तान संघात एक चांगला सामना होईल. जर तुम्हाला विराट कोहली फॉर्ममध्ये आणायचे असेल, तर त्याला सांगा की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरूद्ध सामना आहे. तो फॉर्ममध्ये परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, हे आपण अनेकदा पाहिले आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात देखील विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्ध जबरदस्त खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता.”

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीचे यजमानपद पाकिस्तानडे आहे. पण भारताने चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्याने आयसीसीने मोठा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ हायब्रीड माॅडेल अंतर्गत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे.

भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात करेल. भारत-बांगलादेश संघ (20 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने येतील. यानंतर, भारत आपले उर्वरित साखळी सामने पाकिस्तान, न्यूझीलंडविरूद्ध खेळेल. भारत-पाकिस्तान (23 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने येतील. तर भारत-न्यूझीलंडचे संघ (2 मार्च) रोजी भिडणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पंजाबच्या कर्णधाराची घोषणा झाली, आता RCB-KKR बाकी! पाहा कर्णधारांची यादी
“त्यांचे भविष्य त्यांना स्वतः ठरवू द्या” रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत महान क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
आयपीएल मेगा लिलावानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनसोल्ड ठरला ‘हा’ स्टार खेळाडू

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.