David Warner Flying Catch Video Viral: बिग बॅश लीग २०२५ मध्ये सिडनी थंडर्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आज एक अप्रतिम झेल केला. मागच्या बाजूला धावत जावून हवेत झेपावत डेव्हिडने अशक्य झेल शक्य करून दाखवला. स्पर्धेतील पर्थ स्कॉचर्स विरूद्धच्या या सामन्यात सिडनी थंडर्सने ६१ धावांनी विजय मिळवला. सिडनी थंडर्सने स्कॉचर्सला १५९ धावांचे लक्ष्य दिले व त्यांचा डाव ९७ धावांवर गुंडाळत सोपा विजय मिळवला.
सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुंदर झेल करत कर्णधाराने अष्टोन अगरला ७ धावांवर माघारी पाठवले. मिड ऑफवरून चेंडू सिमापार करण्याचा अष्टोनचा प्रयत्न होता. पण मिड ऑफवर उभा असलेला वॉर्नर मागच्या बाजूला चेंडूच्या दिशेने धावत गेला आणि हवेत झेपावत उल्लेखनीय झेल केला व पर्थ स्कॉचर्सच्या पाचव्या फलंदाजाला तंबूत पाठवले. डेव्हिडचा हा झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियातील या बीग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये वॉर्नर सध्या अव्वल स्थानी आहे. त्या स्पर्धेत तो सिडनी थंडर्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या या खेळाडूने स्पर्धेत त्याने ७ सामन्यांमध्ये ३१६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ९ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळवत ११ गुणांसह संघाला क्रमवारीत प्रथम स्थानी ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर पाकिस्तान प्रिमिअर लीग २०२५ मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. PSL लिलावादरम्यान त्याला कराची किंग्स संघाने 300000 USD म्हणजेच भारतीय रुपयांनुसार २६,००,७६४ रुपयांमध्ये संघात सामील केले आहे. मागच्या हंगामात आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा वॉर्नर आगामी आयपीएल हंगामाच्या लिलावात अनसोल्ड राहिला. पण तो पीएसएलमधील आता सर्वात महागडा म्हणून करराबद्द झाला आहे.