तुम्ही जेव्हा तुमच्या फॅमिली सोबत किंवा मित्र मेत्रीणींसोबत बाहेर जात तेव्हा अनेकदा तुम्ही त्यांना पेट्रोलपंपावर नेहमी ११०किंवा २२५ अश्या आकड्यांमध्ये पैसे देऊन पेट्रोल भरताना पाहिले आहे. तुमच्या देखील मनातच हाच विचार आला असेल ना की कोणत्याही राऊंड फिगरमध्ये पैसे देऊन पेट्रोल- डिझेल का भरले जात नाही. तर १०० किंवा २०० रुपयांच्या राऊंड फिगरच्या प्री-सेटिंगवर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले की कमी इंधन मिळते, असे आपल्या देशातील बहुतांश वाहनचालकांचे मत आहे. त्यामुळे ते ११०, १४५ किंवा २१५ रुपये अशा विषम आकड्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यावर अधिक अवलंबून असतात. आता अश्या पद्धतीने खरंच फायदेशीर आहे का? पेट्रोल पंप मशीन कसे कार्य करते?
सर्वात आधी जाणून घेऊया 100 किंवा 200 रुपयांसारख्या राऊंड फिगरमध्ये पेट्रोल भरल्यास तुमची फसवणूक होऊ शकते असे वाटण्याचे नेमकं कारण काय आहे. खरं तर पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या मशिनमध्ये एक बटण कर्मचारी तुमच्या समोर दाबूनच १०० किंवा २०० रुपयांचे पेट्रोल भरता येऊ शकते, त्यातच पेट्रोल पंपच्या मशीनमधील बटणांमध्ये पूर्वीपेक्षा कमी पेट्रोल भरण्यासाठी सेटिंग करत राहतात, असे लोकांना वाटते. पण हे खरं आहे का? चला तर मग जाणून घेऊयात यामागचे नेमकं कारण
पेट्रोल पंपावर तुमच्या कारमध्ये इंधन भरणारे मशीन प्रत्यक्षात फ्लो मीटर प्रणालीवर काम करते. हे जसे तुमच्या घरात पाणी बिल मीटर काम करते तसे आहे. पेट्रोल भरण्याच्या नोझलमध्ये एक सेन्सर असतो, जो तुम्हाला मीटरवरील इंधन दर त्या त्या दिवशीच्या पेट्रोल च्या किंमतीनुसार त्यावरून गाडीत भरल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या प्रमाणानुसार दाखवतो.
तर याबाबतीत साधे तत्त्व असे की, तुम्ही जेवढे पेट्रोल गाडीत भरता तेवढयाची किंमत पेट्रोल पंप मशिनवर दाखवली जाते. ना कि किंमतीनुसार पेट्रोल पंप मशिन पेट्रोल भरते. आता पेट्रोल पंपावर १०० किंवा २०० रुपयांसारख्या प्री-सेटिंगमध्ये ऑपरेटरने बटण दाबले तरी मशीन तेवढ्याच मात्रेने पेट्रोल भरते जेवढे नोझलमधून वाहते, ही बस पेट्रोल पंपावर वेगाने काम करण्यासाठी पहिल्यापासून सेटिंग केलेली असते.
प्री-सेटिंगमध्ये तुम्हाला योग्य प्रमाणात इंधन मिळत नाही असे वाटत असल्यास तुम्ही प्रत्येक वेळी गाडीत पेट्रोलची टाकी फुल भरणे असा काही उपाय तुम्ही अवलंबू शकता, यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात पेट्रोल मिळेल. दुसरा मार्ग म्हणजे १०० रुपयांत किती पेट्रोल येते हे पाहणे, मीटरमध्ये तेवढेच पेट्रोल दाखवले जात असेल तर तुम्ही निश्चिंत राहू शकता. तिसरा मार्ग म्हणजे तुमच्या कार किंवा बाईकचे फ्यूल मीटर परफेक्ट ठेवा, यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात इंधनाची कल्पना येईल.