Shah Rukh Khan : ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनय आणि बुद्धिमत्तेसाठीही ओळखली जाते. तिने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. तिने हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान असे काही चित्रपट आहेत ज्यात ऐश्वर्याचे नाव आधी समाविष्ट होते, परंतु नंतर ते काढून टाकण्यात आले आणि नंतर ते चित्रपट सुपरहिट ठरले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे सर्व चित्रपट शाहरुख खानसोबत होते.
ऐश्वर्या सोबत पाच चित्रपटांमध्ये दिसणार होती, ज्यात 'वीर झरा' आणि 'चलते चलते' सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली पसंती ऐश्वर्या होती, परंतु नंतर तिचे नाव या प्रकल्पांमधून काढून टाकण्यात आले. तथापि, याचे कारण अभिनेत्रीला कधीही सांगितले गेले नाही. एका जुन्या मुलाखतीत, यागोष्टीचा शाहरुखने खुलासा केला आहे.
शाहरुख खानने मागितली माफी
शाहरुखने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले, सर्व काही त्याच्या हातात नाही कारण तो चित्रपटाचा एकमेव निर्माता नव्हता. ला काढल्याचे कळल्यानंतर त्याला खूप वाईट वाटले, कारण त्याची ऐश्वर्यासोबतची मैत्री खूप चांगली आहे. शाहरुख म्हणाला होता, सर्व महिला सह-कलाकारांमध्ये ऐश्वर्या त्याची आवडती आहे. परंतु, दोघांनी देवदास, मोहब्बतें, जोश सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
जया बच्चन यांची प्रतिक्रिया आली समोर
या घटनेनंतर काही दिवसांनी जया बच्चन यांची प्रतिक्रियाही समोर आली. २००८ मध्ये पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा त्यांना ऐश्वर्याच्या शाहरुख खानच्या चित्रपटांमधून बाहेर पडण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की हा प्रकार मला आवडला नाही ऐश्वर्या सोबत असं करण्यासाठी मी शाहरुखला मारले असते कारण तो माझ्या मुलासारखाच आहे.