पूरक क्षेत्रांची आवड जोपासा
esakal January 15, 2025 09:45 AM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

मोठे भविष्य घडवण्यासाठी खेळ किती महत्त्वाचे आहेत हे आपण यापूर्वी पाहिले. त्याचप्रमाणे, इतर उपक्रम तुमच्या कौशल्यांना आकार देण्यास आणि भविष्यासाठी तयार करण्यात मदत करतात. संगीत या क्षेत्रामुळे तुम्हाला एकाग्रता, लोकांशी तसेच स्वतःशी संवाद साधण्यास मदत होते.

तुम्ही उच्च शिक्षणासाठी अर्ज करत असताना संगीत तुमच्या पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग असू शकतो. संगीत केवळ स्वर गायनाच्या स्वरूपात नाही तर ते नृत्य, वाद्य वाजवणे किंवा लेखनदेखील असू शकते.

त्याचप्रमाणे, इतर क्षेत्रे आहेत जसे की ‘लाइव्ह’ प्रकल्प करण्यासाठी विज्ञान स्पर्धेत भाग घेणे, एखाद्या चांगल्या कारणासाठी कार्यक्रम आयोजित करणे किंवा फक्त शाळा/महाविद्यालयात कार्यक्रमात सहभाग घेता येतो.

वक्तृत्व स्पर्धा, स्पीलबी, ऑलिंपियाड परीक्षा, एनटीएसई, राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा अशा स्पर्धा परीक्षा त्यात्या काळात दिल्या पाहिजेत. या स्पर्धा परीक्षा आपल्याला परिस्थितीसाठी तयार करतात. यशाच्या अपेक्षेने आणि यातून आलेल्या अपयशाच्या ताणाने दबून जाऊ नये.

रूग्णालयात डॉक्टरांना सावलीप्रमाने साथ देणे किंवा अंध मुलांच्या शाळेत एक दिवस घालवणे, किंवा क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे यासारख्या सोप्या संकल्पना मांडणे सर्व भागधारकांना पटवून देणे आणि त्यांना एकत्र करणे, वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी वित्त व्यवस्था करणे अशा अनेक क्रियाकल्पांचा समावेश असतो.

अशा प्रकारच्या परीक्षा किंवा कार्यक्रम एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची मूलभूत रचना तयार करतात. अखेरीस, उच्च माध्यमिक शाळेत किंवा पदवीच्या दरम्यान, एखाद्याला ही कौशल्ये तयार करणे आणि उत्तम प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या गोष्टी करण्याचे अनेक मार्ग आहेत. उदा. शॉर्ट टर्म इंटर्नशिप, जसे की एखाद्या उद्योग, संस्थेत प्रशिक्षण किंवा अनुभव मिळवण्यासाठी वेगळी नोकरी करणे.

असे विशेष कौशल्ये विकसित करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. ही एक प्रक्रिया आहे आणि तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितके चांगले होईल. असे असले तरी, लक्षात आल्यावर लगेच सुरुवात करावी. मूल्यवर्धन आणि बदल तुमच्या वैयक्तिकरित्या हळूहळू होतात. कालांतराने तुम्हाला याची जाणीव होईल. यशाचा ‘मंत्र’ २० टक्के शिक्षण तर ७० टक्के अनुभव आहे. त्यामुळे हे सर्व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम यशस्वी करिअरच्या दिशेने प्रवासात ज्या अनुभवातून जात आहेत त्याचा भाग आहेत.

पुढील काही लेखांमधून यशस्वी करिअर प्राप्त करण्यासाठी नेमके काय करावे लागेल आणि ते कसे करावे हे पाहणार आहोत. विशिष्ट व्यवसाय मिळविण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये कोणती आहेत. करिअरचा प्रवास नोकरी किंवा प्रवेश मिळण्यावर थांबत नाही तर पुढे सुरू राहतो आणि किंबहुना त्यानंतर तो अधिक समर्पक असतो. याचीही आपण माहिती घेणार आहोत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.