वाल्मिक कराड मकोका संतोष देशमुख खून प्रकरण बीड : आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) मंगळवारी मोठा झटका बसला. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केज सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला काल (14 जानेवारी) पुन्हा एकदा बीडमधील केज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांच्यावतीने युक्तीवाद झाला. यामध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आणखी बऱ्याच गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. वाल्मिक कराडची राज्याबाहेर कुठे संपत्ती आहे, त्याचाही तपास बाकी आहे. पोलिसांकडून संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडच्याभोवतीचा फास आवळताय. त्यामुळे वाल्मिक कराडची सुटका होणे आता अवघड आहे.
केज न्यायालयात सुनावणीदरम्यान खंडणी प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने पोलिसांची ही विनंती मान्य केली नाही आणि वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिली. परंतु खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असती तरी जामीन मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला खूप यातायात करावी लागेल कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. एखाद्या गुन्हेगारावर मकोका लागतो, तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालय आणि कोठडी यामध्ये जातो.
वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर पोलीस पुन्हा अॅक्शन मोडवर आली. त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये पोलीस वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागितली जाईल. पोलिसांच्या सूत्रांनूसार, विष्णू चाटे आणि खून प्रकरणातील आरोपी यांच्यादरम्यानचे सहा कॉल झाल्याचं सांगण्यात येत आहे. खंडणी प्रकरण आणि खूनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल्स झालेले आहेत आणि हे सहा फोन कॉल्स वाल्मिक कराडसोबत झाले आहेत. याबाबत आज पोलीस न्यायालयात माहिती देऊ शकतात. खंडणी प्रकरण त्यानंतर विष्णू चाटे यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्याचे धागेदोरे वाल्मिक कराडसोबत जोडले जात आहे.
Walmik Karad MCOCA: मकोका म्हणजे नेमकं काय? शिक्षा काय, वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य?
अधिक पाहा..