Mumbai भांडुप, चेंबूर परिसरातून डोंबिवलीत जाऊन तेथील उजव्या परिवारात स्थान मिळवलेले रविंद्र चव्हाण हे 'गो गेटर' म्हणून रवींद्र चव्हाण प्रसिद्ध आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बट्टी आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी वेळप्रसंगी कट्टीतून शिवसेनेला शह देण्याची कामगिरीही चव्हाण यांनी पार पाडली आहे.
म्हणूनच महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष या नात्याने रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे.
त्यानी साहित्यिक मासिकासारखे उपक्रमही राबवले. ठाणे परिसरात एकसंघ असलेल्या शिवसेनेने लोकसभा पोटनिवडणुकीत दगाफटका करत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी दिली. त्या वेळी पराभूत करण्यासाठी राजेंद्र गावित यांना भाजपमधून जिंकवून देण्यात गिरीश महाजन यांच्या बरोबरीने रवींद्र चव्हाण यांनी कामगिरी बजावलेली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्या मुशीत तयार झालेले चव्हाण डोंबिवलीतील बुद्धिवंत भाजप कार्यकत्यांच्या पठडीत बसणारे नव्हते. 'पिटातली पब्लिक' प्रतिमेबद्दल मध्यमवर्गीय उजव्या परिवारात कुतूहल होते. पोराटोसब्ली हरकाम्या तरुण अशी प्रतिमा बेगुळ्या उंचीवर नेण्यासाठी डोंबिवलीतील लेखक कलावंतांशी संबंध जोडू
शिवसेनेवर वचक ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करून खरा शिवसेनेचा वारसा जपण्यासाठी गुजरातकडे निघून गेले.
तेव्हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून शिंदे सेनेला रसद पुरवण्याचे काम चव्हाण यांनी एकहाती केले. त्यामुळेच शिर्डीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'स्वी कहां हो तुम' अशी व्यासपीठावरून दिलेली सलगीची हाक बरंच काही सांगून जाते. रिदि यांच्यासमवेत राहताना सेनेवर वचक ठेवण्याचे काम चव्हाण यांनी केले, तसेच कोकणपट्टीत भाजपला मिळवून दिलेले यश महत्त्वाचे मानले जाते.