IND vs PAK : 16 जानेवारीला पुन्हा टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, कोण जिंकणार?
GH News January 16, 2025 12:08 AM

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने आतापर्यंत टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बुधवारी 15 जानेवारी रोजी श्रीलंकेचा पराभव करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात पाकिस्तानवर 12 जानेवारी रोजी विजय मिळवला. टीम इंडियाने पाकिस्तानला 109 धावांनी लोळवलं. टीम इंडियाने यासह विजयी सलामी दिली होती. त्यानंतर 13 जानेवारीला इंग्लंडवर 29 धावांनी मात केली आणि सलग दुसरा विजय नोंदवला. तर आज 15 जानेवारीला श्रीलंकेवर 6 विकेट्स विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया चौथ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

इंडिया-पाकिस्तान पुन्हा भिडणार

टीम इंडिया-पाकिस्तान दोन्ही संघ या स्पर्धेत पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया पाकिस्तानवर मात करत सलग चौथा विजय मिळवण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. तर पाकिस्तानचा गेल्या पराभवाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याच चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते.

इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?

इंडिया-पाकिस्तान यांच्यात गुरुवारी 16 जानेवारी रोजी हा सामना खेळवण्यात येणार आहे.

इंडिया-पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया-पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल.

इंडिया-पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया-पाकिस्तान सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळेल.

इंडिया-पाकिस्तान सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर कुठे पाहता येईल?

इंडिया-पाकिस्तान सामना फॅनकोड एपवरुन मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटील, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : विक्रांत केणी (कॅप्टन), रवींद्र संते (उपकर्णधार), योगेंदर भरोदीया, आकाश पाटील, पवन कुमार, नरेंद्र मंगोरे, जितेंद्र, राजेश कन्नूर, निखील मन्हास, आमिर हसन आणि कुणाल फणसे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.