Katrina Kaif: कॅटरिनाने इमरान खानला सेटवर लगावलेली तब्बल 16 वेळा कानशिलात, कारण ऐकून थक्क व्हाल
esakal January 16, 2025 04:45 AM

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या सौदर्याचे सुद्धा खूप मोठे चाहते आहेत. कॅटनिराने अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामामुळे ती चाहत्यांना अधिकच भावते. अशातच तिचा सेटवरील इमरान खानला कानशिलात लगावलेल्या किस्सा चर्चेचा विषय ठरला.

कॅटरिना 2011 मधील 'मेरे ब्रदर की दुल्हन' चित्रपटाचं शूटिंग करत होती. त्यामुळे तिच्यासोबत अभिनेता इमरान खान पहायला मिळाले होते. अशातच सेटवर दोघांमध्ये एक भांडण झाले. त्या भांडणानंतर कॅटरिनाने इमरान खानला तब्बल 16 वेळा कानशिलात लगावली. याचा खुलासा अभिनेता इमरान खानने एका इंटरविंवमध्ये दिला आहे.

इमरानने सांगितलं की, 'कॅटरिनाने मला 16 वेळा कानशिलात लगावली हे खरं आहे. परंतु हा एक चित्रपटातील भाग होता. कॅटरिना तिच्या अभिनयावर खूश नव्हती त्यामुळे तिने 16 वेळा रिटेक घेतला होता.'

कॅटरिनानेही एका इंटरविंवमध्ये स्पष्टीकरण दिले की, 'या सिनसाठी थोडा वेळ लागला. सीन परफेक्ट येण्यासाठी मला 16 वेळा रिटेक घ्यावा लागला. त्यामुळे इमरानला मी 16 वेळा कानशिलात लगावली.'

'मेरे ब्रदर की दुल्हन' हा चित्रपट रोमॅटिक कॉमेडी चित्रपट होता. ज्या चित्रपटामध्ये कॅटरिना कैफ, इमरान खान आणि अली जफर मुख्य भूमिकेत पहायला मिळाले होते. हा चित्रपट 22 कोटींमध्ये बनवण्यात आला होता. परंतु या चित्रपटाने 90 कोटींचा गल्ला जमवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.