Mumbai Local Special Trains : येत्या रविवारी मुंबईत दोन विशेष ट्रेन धावणार, मॅरेथॉनसाठी खास सोय, कसं आहे वेळापत्रक? वाचा
Saam TV January 16, 2025 07:45 AM

Mumbai Local Special Trains Updates : टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ च्या निमित्ताने रेल्वेच्या वतीने मुंबईत विशेष लोकल गाड्या चालविल्या जाणार आहेत. स्पर्धकांना मॅरेथॉनमध्ये सहभागी होता यावे यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रविवारी (१९ जानेवारी) मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विशेष उपनगरीय लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

रविवारी म्हणजे १९ जानेवारीला मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या मॅरेथॉनमध्ये अनेकजण सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षीही असंख्य मुंबईकरांनी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी नोंदणी केली आहे. तेव्हा सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना मॅरेथॉनसाठी वेळेवर पोहोचला यावे यासाठी रेल्वेने २ विशेष लोकल गाड्या चालवण्याचे ठरवले आहे.

लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -

१. लाईन : कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

विशेष ट्रेन कल्याणहून पहाटे ०३.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ०४.३० वाजता पोहोचेल.

२. हार्बर लाईन : पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

विशेष ट्रेन पनवेलहून पहाटे ०३.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ०४.३० वाजता पोहोचेल.

या दोन्ही विशेष गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. स्पर्धकांसह सामान्य प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज (१५ जानेवारी) रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल ट्रेनसंबंधित पत्रक प्रसिद्ध केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.