Gautam Gambhir accused Sarfaraz Khan of leaking News from Dressing Room : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना गमावल्यानंतर क्रिकेटपटूंवर संतापला, अशी बातमी समोर आली होती. सामन्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गंभीरने “बस बहुत हो गया” असे सर्व खेळाडूंना सुनावलं होतं. मुख्य प्रशिक्षकाची ड्रसिंगरूममधील ही चर्चा लिक झाली होती व मीडियाला समजली होती. ही बातमी क्रिकेटपटू ने लिक केल्याचा आरोप गौतम गंभीरने केला आहे.
न्यूज २४ स्पोर्ट्च्या अहवालानुसार, बीसीसीआच्या आढावा बैठकीमध्ये, मुख्य प्रशिक्षकाने बातमी लिक केल्याचा अरोप सरफराज खानवर केला. गंभीर म्हणाला, "मेलबर्न कसोटीतील परभवानंतर मुख्य प्रशिक्षकाच्या संतापाबद्दलची बातमी सरफराजने बाहेर पसरवली."
अहवालात असेही म्हटले आहे की गंभीरच्या रागामुळे त्याच्या कारकिर्दीला बाधा निर्माण होऊ शकते. अंतिम कसोटीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना गंभीरने हा खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे साधला गेलेला संवाद असल्याचे सांगितले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर म्हणाला, "खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांच्यासोबत साधला गेलेला हा एक संवाद होता. ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेली चर्चा हा केवळ अहवाल आहे, त्यात तथ्य नाही. आणि खेळाडू व प्रशिक्षकामधला संवाद हा ड्रेसिंग रूममध्ये राहायला हवा. बाहेर येता कामा नये."
गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत साधलेल्या संवादाबाबतही सांगितले. गंभीर म्हणाला, "जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोकं आहेत, तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे. तुम्हाला ड्रेसिंग रूममध्ये कायम ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे कामगिरी. हेच माझे प्रमाणिक शब्द होते आणि प्रमाणिकपणा महत्त्वाचा आहे."