Satara Crime : मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघांना अटक: खासगी बस चालकाचे कृत्य; संशयित पाटखळ माथा, सदरबझारचे
esakal January 16, 2025 12:45 PM

सातारा : शाळेत सोडणाऱ्या खासगी बस चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन राजाराम पवार (वय २८, रा. पाटखळ माथा, ता. सातारा) व पुष्कर कांबळे (रा. सदरबझार, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, नितीन पवार याची खासगी बस असून, तो दररोज मुला-मुलींना शाळेत बसने सोडतो. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. हे माहीत असतानाही त्याने मुलीशी ओळख वाढवली व संपर्क करू लागला.

यानंतर त्याने मित्र असलेल्या पुष्कर कांबळे याच्या सदरबझार येथील घरात ऑक्टोबर महिन्यात मुलीला नेले. तेथे नितीन पवार याने मुलीवर अत्याचार केले. या सर्व घटनेने मुलगी घाबरली, तसेच संशयिताने मुलीसोबत फोटो काढले. यामुळे पीडित मुलगी अधिकच घाबरली व तिने कोणाला याबाबतची माहिती दिली नाही.

या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घरात अबोल राहू लागली व घाबरल्यासारखी राहू लागली. यामुळे आईला शंका आल्याने तिने मुलीला बोलते केले असता मुलीने घडलेल्या घटनेची माहिती दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.