मुंबई : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या उद्योगसमुहातील कंपन्या ज्या संस्थेच्या अहवालामुळं अडचणीत आल्या होत्या ती संस्था हिंडेनबर्ग रिसर्चनं (Hindenburg Research) त्यांचं कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. नेट अँडरसननं सोशल मीडियावर पोस्ट करुन हिंडेनबर्ग रिसर्च बंद करत असल्याची घोषणा केली. त्यामुळं आज शेअर बाजार सुरु झाला तेव्हा अदानी उद्योग समुहाच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली.
अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कंपन्यांपैकी अदानी पॉवरचा स्टॉक 7.8 टक्क्यांनी वाढला. अदानी ग्रीन एनर्जीचा स्टॉक 7.8 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी सोल्यूशन्स 5.18 टक्क्यांनी वाढला. एसीसी सिमेंट 3.47 टक्क्यांनी तर, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 5.78 टक्क्यांनी वाढले. अदानी पोर्टस अँड एसईझेड 4.29 टक्के, अदानी टोटल गॅस 5.21 टक्क्यांनी वाढले. अंबुजा सिमेंटचा शेअर 4.01 टक्क्यांनी वाढले. संघी इंडस्ट्रीजचे शेअर 2.92 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे अदानी विल्मरचे घसरले आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्चनं जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुप विरोधात एक रिपोर्ट जारी करुन बाजारात फेरफार आणि अकाऊंटिंग घोटाळ्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे स्टॉक्स कोसळले होते. अदानी ग्रुपचं मार्केट कॅपिटलायझेशन 20 लाख कोटींवरुन 7.50 लाख कोटींपर्यंत आलं होतं.
हिंडेनबर्गनं 24 जानेवारीला अदानी ग्रुप विरोधातील पहिला रिपोर्ट जारी केला होता. त्या मध्ये अदानी ग्रुपवर स्टॉकच्या हेराफेरी आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. ते आरोप अदानी ग्रुपकडून फेटाळण्यात आले होते.
हिंडेनबर्गनं 10 ऑगस्ट 2024 सेबी प्रमुख माधवी पुरी बुच विरोधात रिपोर्ट जारी केला होता. माधवी बुच आणि धवल बुच यांच्या कथित गुंतवणुकीमुळं सेबीनं अदानी रिपोर्टवर कारवाई केली नव्हती असा आरोप केला होता. मात्र, माधवी बुच यांनी ते आरोप फेटाळले होते.
नेट अँडरसननं हिंडेनबर्ग रिसर्चनं त्यांच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक्सवर संस्थापक नेट अँडरसननं वैयक्तिक नोट शेअर केली. गेल्या वर्षाच्या शेवटी मित्र, आमच्या टीमला आणि कुटुंबीयांना हिंडेनबर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. संशोधनाच्या संकल्पनांच्या आमचे सुरु असलेले प्रकल्प पूर्ण केल्यानंतर कंपनी बंद करण्याचा विचार होता. हिंडेनबर्ग रिसर्चनं काही दिवसांपूर्वी त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट पाँझी स्कॅमबाबतचा पूर्ण केला होता.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..