नाशिक : शहरात तीन दिवसांत नायलॉन मांजा वापरून पतंग उडविणाऱ्यांसह ८८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. नायलॉन मांजामुळे २३ वर्षीय तरुणाचा बळी गेल्याने अज्ञाताविरोधात सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा दाखल झाला आहे. अडीच महिन्यांत या प्रकरणात ११८ संशयितांविरोधात गुन्हे दाखल करीत सुमारे १५ लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
चुंचाळे पोलिस चौकीचे अंमलदार अर्जुन कांदळकर यांच्या फिर्यादीनुसार संशयित सचिन शिंदे (२८, रा. श्यामतीर्थ अपार्टमेंट, आरटीओ कॉलनी, बोधलेनगर, नाशिक) त्याच्या विंटो कारने (एमएच ०१ बीजी २७५४) अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉइंटवरून जात असताना पोलिसांनी त्याला रोखले. कारची तपासणी केली असता त्यात सात हजार ७०० रुपयांच्या नायलॉन मांजाचे ११ गट्टू, ८६ हजार ४०० रुपयांचे नायलॉन मांजाचे दोन बॉक्समधील ९६ गट्टू आढळले. तीन लाखांच्या कारसह मांजा असा तीन लाख ९४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला.
संशयित शिंदे यास अटक करण्यात आली आहे. भगूर गावातील टेंभी नाका शाळेच्या भिंतीलगत संशयित मयूर चव्हाण (२२, रा. भगूर) यास अटक केली असून, त्याच्याकडून सहा हजारांचा नायलॉन मांजा जप्त करीत देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल केला. सागर चारस्कर (२५, रा. दारणानगर, पळसे राजवाडा), महेश नाईक (२९), स्वप्नील लोंढे (२७, दोघेही रा. सिन्नर) या तिघांजवळून पाच हजार ५०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करीत त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
१५ लाखांचा नायलॉन जप्त
शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत नोव्हेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ यादरम्यान नायलॉन मांजाविक्री व वापर करणाऱ्या ११८ संशयितांविरोधात गुन्हे दाखल झाले. या काळात १५ लाख २४ हजार ५०० रुपयांचे एक हजार ४५६ नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले आहेत. तसेच, ७८ संशयितांना शहर-जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
शोध घेणार
नायलॉन मांजा विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. यातून संशयितांनी मांजा कोणाकडून खरेदी केला, तसेच मांजाचे उत्पादन कुठे घेण्यात आले, याचा शोध घेतला जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
संक्रांतीला नायलॉन मांजाचे दाखल गुन्हे
- नीलेश कडाळे (२५, रा. कुमावतनगर, पेठ रोड)
- नीतेश जाधव (२५, रा. वास्तुरंग सोसायटी, पेठ रोड)
- इशान अहिरे (१९, सुयश पार्क, राजीवनगर)
- १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा (रा. पंचशीलनगर, गंजमाळ)
- प्रज्जोत वालझाडे (२०, रा. राजीवनगर)
- राजदीप ठाकूर (२०, रा. धनकोर अपार्टमेंट, अशोकामार्ग)
- साहिल निकम (१८)
- मयूर मल्ले (१८, दोघेही रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव)
- राकेश परदेशी (२०, रा. वडाळागाव)
- प्रवीण बैसाख सिंग (३१, रा. वडनेर-पाथर्डी रोड)
- अमोल बैरागी (४४, रा. शिवराज सोसायटी, माणिकनगर, सिडको)
- साहिल वारके (१८, रा. उत्तमनगर, सिडको)
- पृथ्वी देवकर (१८, रा. ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा)
- मोइद्दीन नूर मोहम्मद सय्यद (३३, रा. गुलशननगर, वडाळागाव)
- तन्मन तांबट (२०, रा. अशोकनगर, सातपूर)
- मिहिर नंदी (२०, रा. गजरा अनमोल अपार्टमेंट, पांडवनगरी)
- नयन लालसाहेब सिंग (२१, रा. गजरा अनमोल अपार्टमेंट, पांडवनगरी)
- संतोष पाल (२२, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, नरहरीनगर, पाथर्डी फाटा)
- नमन लालसाहेब सिंग (२५, रा. गजरा अनमोल अपार्टमेंट, पांडवनगरी)
- अक्षय पाटील (३२, रा. शिवकॉलनी, पांडवनगरी)
- राजेंद्र सूर्यवंशी (५०) व १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा (दोघे रा. पवननगर, सिडको)
- स्वराज टिळे (२०, रा. पवननगर, सिडको)
- आदेश परदेशी (२४)
- भूषण एखंडे (२४, दोघे रा. पवननगर, सिडको)
- संजय टाके (४९,रा. फर्नांडिसवाडी, जयभवानी रोड)
- सागर बारी (२७, रा. नाशिक-पुणे रोड)
- कृष्णा पवार (२५, रा. प्रेस कॉलनी, गांधीनगर)
- मयूर चव्हाण (२२, रा. भगूर)
तीन दिवसांतील कारवाया
तारीख.... एकूण गुन्हे..... सदोष मनुष्यवध ..... सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ..... एकूण संशयित... पालक ... अल्पवयीन संशयित .... अज्ञात संशयित... अटक संशयित ... पोलीस कोठडी... न्यायलयीन कोठडी
१२ जाने. .. २४...००..२४...३३..०८...०९..००...२४...०८...१६
१३ जाने. ...१३ ...००...१३...२१...०४...०६...००...१५...०३...१२
१४ जाने. ...१७... ०१...१६...३४ ..०१...०२...०१...३१ ... (माहिती उपलब्ध नाही)
एकूण... ५४...०१...५३...८८..१३...१७...०१...७०...११...२८