अभिनेता सैफ अली खानवर आज पहाटे जीवघेण्या हल्ला झाला. यावेळी बॉलिवुडमध्ये खळबळ उडाली.आता या घटनेवर शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
"मुंबईतील कायदा व सुव्यस्था ढासळण्याचे हे लक्षण आहे. याचे कारण म्हणजे मध्यंतरी त्याच भागात एकाची हत्या झाली होती. यामुळे हा दुसरा प्रयत्न म्हणता ये आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी गृहखाते त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावे,
तर दुसरीकडे संजय राऊत म्हणाले की कलाकारांना सुरक्षा आहे, तिथे हल्लेखोर घुसत आहेत खरं तर हा पंतप्रधान मोदींना धक्का आहे. 15 दिवसांपूर्वी सैफ अली खान कुटुंबासह मोदींच्या भेटीला गेले होते. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबासोबत एक तास घालविला होता. आणि आता सैफ अली खानवर हल्ला झाला तो कोणी केली हा पुढचा प्रश्न आहे. या राज्यात कुणीही सुरक्षित नाही, महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झाले आहे. हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे.
राज्यातील जनता सुरक्षित नाही बीडपासून मुंबईपर्यंत कुठेही कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकार सभा शिबिरांमध्ये व्यस्त आहे. 90 टक्के पोलिस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेत आहेत, राज्यातील जनता सुरक्षित नाही. राज्यात काय सुरु आहे हे याचा गृहमंत्र्यांनी विचार करायला हवा असा टोलाही त्यांनी लगावला.