Maharashtra Live Update: मद्यपान करुन बसवर दगडफेक करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
Saam TV January 17, 2025 03:45 AM
Kolhapur : मद्यपान करुन बसवर दगडफेक करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

मद्यपान करून केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

व्हीनस कॉर्नर परिसरात दोन दिवसांपूर्वी तीन तरुणांनी मद्यपान करून केली होती दगडफेक

या घटनेतील तिन्ही तरुण आरोपींना पोलिसांनी व्हीनस कॉर्नर परिसरात आणलं आहे.

या तिन्ही आरोपींनी मद्यपान करून कशा पद्धतीने दगडफेक केली याची तपासणी या आरोपींना घेऊन पोलीस करत आहेत.

आरोपींची दहशत नागरिकांमध्ये कमी व्हावी यासाठी पोलिसांनी या तिन्ही आरोपींना आणलं रस्त्यावर.

Pune : भारतीय जनता पार्टीचा संविधान गौरव अभियान कार्यक्रम सुरु

भारतीय जनता पार्टीचा संविधान गौरव अभियान कार्यक्रमाला सुरुवात.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुण्यात संविधान सभा कार्यक्रमाला लावली हजेरी.

या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे,आमदार हेमंत रासने उपस्थित.

एटीएम फोडणारे चौघे अटकेत

कोवाड मधील एटीएम फोडणारे चौघे अटकेत, सीसीटीव्ही वायरल

कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड इथं राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून 18 लाख 77 हजार रुपयांची रोकड चौघांनी पळवली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अखेर या चौघांना जेरबंद केले.

तालीम खान, अलीशेर खान, तस्लिम खान, अक्रम खान या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे

बसवर दगडफेक करणारे तीन दारुडे पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापुरातील केएमटी बसवर दगडफेक करणारे तीन दारुडे पोलिसांच्या ताब्यात

दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील इंद्रप्रस्थ बारमधून दारू पिऊन आलेल्या काही तरुणांनी व्हिनस कॉर्नर येथे वाहनांची आडवणूक करून बसवर केली होती दगडफेक

मध्य धुंद तरुणाचा धिंगाणा सीसीटीव्ही कैद

दगडफेकीनंतर पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.....

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. रात्री २.३३ वाजता तो हल्ला करून बाहेर पडत असताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

पुणे शहरात पुन्हा सापडला मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा

पुणे शहरात पुन्हा सापडला मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केले एम डी ड्रग्स

पुणे पोलिसांनी जप्त केला २३ लाख रुपयांचे एम डी ड्रग्स

अहमद खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

११० ग्रॅम वजनाचा MD ड्रग्सचा साठा जप्त

फेरील्यांच्या हक्कासाठी चेंबुरमध्ये आनंदोलन

फेरीवाल्यांच्या न्याय - हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून आनंदोलन.

अनेक वर्षापासून असलेल्या फेरीवाला पूर्णर्वसन करा, पात्र फेरीवाल्यावर फेरीवाल्यावर महानगर पालिका आणि पोलिस प्रशासन अन्याय करत असल्याची आठवले गटाची मागणी.

फेरीवाल्यांचे कुटुंबासह भिकमागो आनंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाच्या उद्घाटन

नॅशनल स्टार्टअप दिवस साजरा करणे आनंदाचा दिवस

आजच्या दिवशी 2016 मध्ये 471 स्टार्टअप होते, आज ही संख्या 1 लाख 57 हजार आहे

पण या संख्येवर थांबून चालणार नाही

महिला या कामासाठी रोल मॉडेल ठरू शकतं

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

महेश गायकवाड - गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण : फरार आरोपी नागेश बडेरावला अटक

महेश गायकवाड - गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात फरार आरोपी नागेश बडेरावला अटक.

कल्याण क्राईम ब्रँचने आरोपी नागेश बडेरावला शिर्डी येथून अटक केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीला ठाणे क्राईम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आले आहे.

उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.

चोरीच्या नऊ दुचाकींसह सराईत चोरटा अटकेत

सराईत चोरट्या नऊ मोटरसायकलसह अटकेत

धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

तीखी फाटा परिसरातून आवळल्या मुसक्या

सुप्रिया सुळे यांची हार्वेस्टर अनुदानाच्या वादात ऊडी

- हार्वेस्टर अनुदानाच्या वादात सुप्रिया सुळे यांची ऊडी

- ⁠हरवेस्टर मालक रामचंद्र भोसले यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली

- ⁠पुणे ग्रामीण अधीक्षक पंकज देशमूख यांच्याशी फोनवर चर्चा केली

हरवेस्टर मालकांना भेटण्यासाठी उद्या वेळ देण्याची मागणी केलीय

- हार्वेस्टर प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची तक्रार घेण्याची पोलीस अधीक्षकांकडे सुळे यांची मागणी

नांदेड शहरातील डी-मार्ट मधून खरेदी केलेल्या हल्दीरामच्या शेवमध्ये अळ्या

ग्राहक धनंजय सूर्यवंशी यांनी नांदेड शहरातील डी मार्ट मधून काही सामान खरेदी केले होते.

त्यामध्ये हल्दीराम चे प्रॉडक्ट असलेल्या भुजिया सेव मध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार त्यांना घरी आल्यानंतर लक्षात आला.

त्यानंतर त्यांनी डी मार्ट मध्ये जाऊन परत चौकशी केली असता दुसऱ्या पॉकेटमध्ये सुद्धा अळ्या आढळून आल्या आहेत.

नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू असल्याचा प्रकार पुढे आल्याने कारवाई करावी अशी मागणी धनंजय सूर्यवंशी यांनी केली आहे.

चाकण शिक्रापूर रोड वर भीषण अपघात; कंटेनरने दिली २०-२५ वाहनांचा धडक

कंटेनर ने दिली २० ते २५ वाहनांना धडक

चाकण ते चौफुला जवळपास १५ ते २० किमी अंतर आहे

चाकण शिक्रापूर रोडवर अपघातात चाकण मध्ये दोन महिलांना उडवले

त्यांनतर पुढे मेदनकर वाडी फाटा येथे पाच वर्षाची मुलीला उडविले..

पुढे शेल पिंपळगाव मध्ये सेलेरो आणि एका गाडीला उडविले.. त्यानंतर पुढे बहुळ गावमध्ये पोलिसांची एर्टिगा गाडीला सुद्धा धडक

चौफुला मध्ये टाटा एस ही गाडी पलटी होऊन तिच्या खाली महिला अडकली

चाकणपासून पळून जात कंटेनर चालकाने वाहनांना धडक दिली

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार, एक जखमी; २ अटकेत

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराचा प्रकार घडलाय. सिंहगड कॉलेज परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला असून, तीन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मध्यरात्री दिड वाजता ही घटना घडलीय. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून, गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे परळीत दाखल, वैजनाथ मंदिरात घेतलं दर्शन

मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मतदारसंघात...

परळी येथील वैजनाथ मंदिरात धनंजय मुंडे यांनी घेतल दर्शन...

वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे परळीत..

जलसंपदा विभागाच्या आजपर्यंतच्या कारभारावर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची नाराजी

- इथून पुढे पाण्याची उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही, विखे पाटील यांचा अधिकाऱ्यांना इशारा

- बिगर सिंचनाचं पाणी कमी करून सिंचनाला पाणी वाढवण्याचा प्रयत्न

- नाशिक जिल्ह्यातील काही गावांना धरणांमधून पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्याचा देखील विचार

- कालवा सल्लागार समितीचे महत्त्वाची बैठक असताना देखील अनेक अधिकारी अनुपस्थित

- अधिकाऱ्यांना बैठकीचं गांभीर्य नाही हे दुर्दैवी

Mira-Bhayandar: मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग कार्यालय बाहेर आंदोलन

मनसे कार्यकर्त्यांनी प्रभाग समिती कार्यालयाला ठोकले टाळे

प्रभाग अधिकारी सुधाकर लेंडवे कार्यालय सोडून काढला पळ

शहरात वाढते अनधिकृत बांधकाम बाबत मनसेचे आंदोलन

प्रभाग कार्यालय जवळ पोलीस दाखल,आंदोलनचा इशारा मनसे दिला होता

देशात प्रसिद्ध असलेल्या सारंग स्वामी यात्रेला सुरुवात पहा 12 प्रकारच्या भाज्या शिजवणे सुरू

देशभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या सारंगस्वामी यात्रेला सुरुवात झाली आहे, वसमत तालुक्यातील सारंगवाडीच्या माळरानावर ही यात्रा भरते, 532 वर्षाची परंपरा असलेल्या या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे बारा प्रकारच्या पाले व फळभाज्या एकत्रित शिजवून यात्रेत आलेल्या भाविकांना महाप्रसाद स्वरूपात या भाज्या वाटप करण्यात येतात दरम्यान या यात्रेच्या आठ दिवसा अगोदर पासून या शेकडो क्विंटल महाप्रसादाची आयोजकांच्या वतीने तयारी करण्यात येते, या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारताच्या विविध राज्यातील भाविक उपस्थित होतात, आंध्र प्रदेश कर्नाटक सह तामिळनाडू मधून भाविक दोन दिवस आधीच सारंग स्वामी च्या माळावर असलेल्या मठात मुक्कामी येतात

शासकीय नोकरीत असणाऱ्याचे नाव शिधापत्रिकेतून केले कमी.

शासकीय नोकरीत असताना सुद्धा प्राधान्य गटामधून शिधापत्रिकाधारक असल्याने मोफत रेशन अन्नधान्य उचल करत असल्यानेचे नावे अखेर कमी करण्यात आली. नागपूर शहरामध्ये शिधापत्रिकाधारकांची संख्या चार लाख 25 हजार इतकी आहे. 16 लाख 57 हजार लाभार्थी संख्या आहे. यातील काही घरांमध्ये सदस्य हे शासकीय नोकरीमध्ये असताना शिधापत्रिकेतुन सुद्धा नाव कमी करून घेतले नव्हते. त्यामुळे शासनाकडून ती यादी मिळाली. त्यानंतर अन्नपुरवठा अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करून 3589 प्राधान्य गटात असलेले नाव काढून टाकण्यात आले.. NPH अप्रधान्य गटात टाकून अनुदानीत धान्य बंद करण्यात आले.

धाराशिव जवळील शिंगोली बायपास जवळ एसटी बस व ट्रकचा भिषण अपघात

धाराशिव जवळील शिंगोली बायपास जवळ एसटी बस व ट्रकचा भिषण अपघात

एसटी बसमधील दोन,तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती - बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान तर

अपघातानंतर सोलापुर हुन भरधाव वेगाने आलेला ट्रक मेघदुत हॉटेलसमोर झाला पलटी

अपघातानंतर काही वेळ वाहतुक विस्कळीत तर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत केला पंचनामा

ट्रक पलटी होतानाची घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद - सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान घडली घटना

Saif Aali Khan : सैफ अली खान याला भेटण्यासाठी सारा अली खान लिलावती रूग्णालयात दाखल झाली आहे. Maharashtra Live Update : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा

माजी उपसरपंचांची कार गाडीला काळ्या काचा असल्याने केली जप्त

गाडीवर २३ हजाराचा दंड पण थकीत होता

फर्ग्युसन रस्त्यावर गाडी फिरताना दिसली गाडी काळी आणि काचा पण काळ्या असल्याने सजग नागरिकाने अमितेश कुमार यांना वीडियो पाठवला

आयुक्तांनी गाडीचे चौकशीचे आदेश दिले चौकशी केली असता अमोल कारले यांच्या नावावर ही गाडी आहे

वारजे पोलिसांनी फॉर्च्युनर गाडी घेतली ताब्यात

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नाशिकच्या नियोजनात भवनात महत्वाची बैठक

- नियोजन भवन येथे जलसंपदा अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त बैठकीला उपस्थित

- तर खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार बैठकीला उपस्थित

- गंगापूर, कडवा कालवा सल्लागार समितीचीही बैठकीला उपस्थिती

- उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या पाणी प्रश्न संदर्भात चर्चा होण्याची शक्यता

- मराठवाड्याला ७% पाणी कमी देण्याची शिफारस गोदावरी अभ्यासगटाने महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल दिला होता त्यावरही चर्चा होण्याची शक्यता

पुण्यातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत

वाहतूक विभाग , पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले आदेश

Baramati News : काका-पुतणे एकाच मंचावर

बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनेत्रा पवार,आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र येणार का? संवाद साधणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सामाजिक असो राजकीय नेत्यांनी तेढ निर्माण करणारे वक्तव्य करू नये- तायवाडे बबनराव तायवाडे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघधनंजय मुंडेंच्या टोळ्या जातीय तेढ निर्माण करत असल्याचा मनोज जरांगेच्या वक्तव्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जोरदार समाचार घेतला... राज्यात अश्या घटना घडत असतात सामाजिक नेते असो की राजकीय नेते असो यांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे असताना असे वक्तव्य करू नये. उलट असे वक्तव्य करून तेढ निर्माण करत असल्याच प्रतिउत्तर दिले.. या वक्त्यावाचा निषेध करत असल्याचं म्हणत जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोप करणे हे चुकीचे आहे. Nandurbar : नंदुरबार जिल्हा परिषदेसह 6 पंचायत समितीवर प्रशासक राज

नंदुरबार जिल्हा परिषदेसह नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा व नवापूर पंचायत समितीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जारी केले आहेत. राज्यातील नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने प्रशासक नियुक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेसह नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा व नवापूर पंचायत समितींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नंदुरबार जि.प. व जिल्ह्याभरातील सहाही पंचायत समितींचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणूका मुदतीत घेणे शक्य नाही म्हणून संबंधीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर नियुक्ती करावी असे पत्रात म्हटले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 6 पंचायत समितीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी काढले आहे.

Saif Aali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, मुंबई पोलिसांकडून सात तपास पथकांची स्थापना

अभिनेता सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून सात पथकांची (टीमची) स्थापना करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सात टीम सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा तपास करणार आहेत. मुंबई गुन्हे शाखेने देखील सुरू केला आहे. हल्ल्याचा समांतर तपास प्रत्येक अँगलने करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

शरद पवारअभिनेत्यावर हल्ला हे मुंबईची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किती खाली ढासळते आहे. याचं हे उदाहरण आहे. एकाची हत्या त्याच भागात झाली आणि आता दुसऱ्यावर हल्ला.. चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे कारण लोक आता त्यांच्याकडे अपेक्षेने पहात आहे. पंढरपुरातील चंद्रभागेत वाळू चोरांचा धुडगूस;अवैध वाळू उपसामुळे चंद्रभागेचे अस्तित्व धोक्यात..

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागेत वाळू चोरांनी अक्षरशा धूडगूस घातला आहे. चंद्रभागेच्या पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा केला जात असल्याने चंद्रभागेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Maharashtra Breaking Live Marathi : किल्ले रायगडावर 345 वा छ. संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा

छत्रपती संभाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळ आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते हा राज्याभिषेक केला जातो. या वर्षी स्वतंत्र संग्रामात योगदान देणाऱ्या क्रांतीकारकांच्या वंशजांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.

छ. संभाजी महाराजांच्या 345 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर पुरातन वास्तु, राजदरबार विवीध रंगाच्या फुलांनी सजवण्यात आला आहे.

Maharashtra Live Update : १७ तरुणांची दीड कोटीने फसवणूक, शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा

रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे आमिष देऊन तब्बल १७ तरुणांकडून १ कोटी ५६ लाख रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आलाय, या प्रकरणात तरुणाच्या तक्रारीवरून अमरावती ग्रामीण पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्षासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याने चांगलीच खळबळ उडालीय. शिवसेना शिंदे गटाचा शहराध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव आणि माँटी उर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावं आहेत, या प्रकरणात मंगेश वसंतराव हेंड यांच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पोलिसानी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत..

Maharashtra Live Update : उल्हासनगरच्या श्रीरामनगर भागात चार दिवस पाणी नाही!

पाण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून त्रास भोगणाऱ्या उल्हासनगरातील श्रीरामनगर भागातील महिलांनी नेताजी चौकातल्या पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा देत महिलांनी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मांडला. त्यांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

सोमवारी सायंकाळी अंबरनाथच्या पालेगावमध्ये पाण्याच्या मुख्य लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उल्हासनगरच्या कॅम्प ४ आणि ५ मधील पाणीपुरवठा अचानक बंद झाला. मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती. मात्र, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी देखील पाणी न आल्यानं महिलांनी आणि नागरिकांनी थेट आंदोलनाचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत इथून हलणार नाही, असं ठणकावत त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. यानंतर तातडीने श्रीरामनगर परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

शासन आदेश जारी, वाशिम जिल्हा परिषदेवर प्रशासक पाहणार कामकाज

वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १५ जानेवारीला सायंकाळी संपला, तर १६ जानेवारीला सायंकाळी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीला मुदतवाढ नसून या ठिकाणी प्रशासक राज येणार आहे. या संदर्भात शासन आदेश जारी झालाय.

हौशी शेतकऱ्याने साजरा केला आपल्या लाडक्या " सर्जा " चा धुमधडाक्यात वाढदिवस

हौसेला मोल नसतं...! असं काहीस बुलढाणा जिल्ह्यातील मारोड गावातील दीपक पाटील या शेतकऱ्याने करून दाखवलं , आपल्या घरच्या लाडक्या गाईने जन्माला घातलेल्या वासराचा अर्थात "सर्जा" चा पहिला वाढदिवस या शेतकऱ्याने धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी केक कापून संपूर्ण गावाला गोड जेवणावळी ही देण्यात आली. "सर्जा" जन्माला आला तेव्हापासून घरात आनंदी वातावरण असल्याची भावना ही या शेतकऱ्याने बोलून दाखवली.

भंडाऱ्यात आरटीई'च्या चार शाळा घटल्या, विद्यार्थी संख्या ५५ ने वाढली

आरटीईअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मोफत शाळा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १४ जानेवारीपासून सुरू झाली आहे. पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत शाळांची संख्या घटली असली तरी प्रवेशित होणाऱ्या मुलांची संख्या वाढणार आहे. जिल्ह्यातील ८७ शाळांत ८२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.गत शैक्षणिक वर्षात आरटीईअंतर्गत ९१ शाळांची नोंदणी झाली होती. तर ७७२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. परंतु ती प्रक्रिया उशिरापर्यंत चालली. प्रवेशासाठी अनेक पालकांची उदासीनता दिसून असली. ही स्थिती पाहता, शासनाच्या वतीने यंदा आरटीईअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५- २६ साठी मोफत शाळा प्रवेश प्रक्रिया लवकर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८७ शाळांचीच नोंद झाली असून, चार शाळांची नोंद झालेली नाही. परंतु प्रवेशित होणाऱ्या मुलांची संख्या ८२७ इतकी राहणार आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांना २७ जानेवारीपर्यंत मुलांचा ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विहित मुदतीनंतर बालकाला प्रवेश दिला जाणार नसल्याचे देखील पत्रात नमूद आहे.

crime : जालन्यात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी 15 जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

जालन्यात गोंदी येथील गोदावरी नदीपात्रातून केनीचा वापर करून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 15 व्यक्तींविरोधात जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत जवळपास 100 ब्रास वाळू देखील जप्त करण्यात आली आहे.महसूल पथकाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. अंबडचे नायब तहसीलदार विवेक उढान यांच्या फिर्यादीवरून संघटितरित्या वाळू चोरी केल्याप्रकरणी तब्बल 15 वाळूमाफिया विरोधात जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय . या प्रकरणाचा अधिक तपास गोंदी पोलीस करत आहे..

jalana : जालन्यात महानगरपालिकेने 15 अतिक्रमण केली जमिनदोस्त

जालना शहर महानगरपालिका अतिक्रमण धारकांविरोधात ॲक्शन मोडवार आली असून महानगरपालिकेने तब्बल 15 अतिक्रमण जमिनदोस्त केली आहे तर 36 नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीस देखील महानगरपालिकेने बजावल्या आहे. जालना शहरातील अंबड रोडवरील रहदारीस अडथळा निर्माण करणारे आरसीसी वॉल कंपाऊंड आणि आरसीसी दुकाने अशी एकूण 15 अतिक्रमणे महानगरपालिकेने जमिनदोस्त केली असून परिसरातील 36 नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीस देखील महानगरपालिकेने बजावल्या आहेत. दरम्यान अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम जालना शहर महानगरपालिका आठ दिवस राबवणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.