Best Cooking Oil: कोलेस्ट्रॉल वाढलंय? आहारात या तेलाचा वापर ठरेल फायदेशीर…
GH News January 18, 2025 08:09 PM

तेलाचा कोणत्याही पदार्थामध्ये जास्त वापर केल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्यामध्यये तेलाचा वापर केला जातो. परंतु जास्त प्रमाणात तेलाचा वापर केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर केल्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरु शकते. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना किंवा कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी कमी प्रमाणात तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल अनेक झिरो ऑईल कुकिंग ( Oil Cooking) याचे व्हिडिओज सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतात.

तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे ३ प्रकारच्या तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आहारात करू शकता. या तेलांचा तुमच्या आहारामध्ये सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. या तेलाचा तुमच्या आहारामध्ये वापर केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाते त्यासोबतच तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. या तेलाच्या वापरामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत करते.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुले तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईलमधील ओलिक अॅसिड तुमच्या शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करते.

अव्होकाडोचं तेल

अव्होकाडोच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. अव्होकाडोच्या तेलाचा वापर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. अव्होकाडोच्या तेलाचा वापर तुम्ही कोणत्याही पदार्थाच्या तळण्यासाठी आणि ग्रिल करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अव्होकाडोच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि डी भरपूर प्रमाणात आसतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते आणि तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

नारळचं तेल

नारळाच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात मीडियम-सीरीज ट्रायग्लिसराइड्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये मेटाबोलाईज होतात आणि तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिड असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होईल. नारळाच्या तेलाचा जास्त प्रमाणात उपयोग केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.