पाकिस्तानचा पहिला स्वदेशी सॅटेलाइट लॉन्च, सोशल मीडियावर बनला जोक, फोटो पाहून युजर म्हणाले…
GH News January 18, 2025 08:09 PM

पाकिस्तानने आपला पहिला स्वदेशी उपग्रह लाँच केला. चीनच्या जिउक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरुन इलेक्ट्रो-ऑप्टिकल (EO-1) उपग्रहाचे प्रेक्षपण करण्यात आले. हा उपग्रह लॉन्च केल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियातून दिली. त्यानंतर सोशल मीडियावर हा जोकचा विषय बनला. लोक त्या पोस्टवर खूप कॉमेंट करत आहे. अनेक मीम्स तयार केले गेले आहे. अनेकांनी त्या उपग्रहाची तुलना पाण्याच्या टाकीशी केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे कौतूक करत त्याचे प्रेक्षपणाची बातमी शेअर केली. सोशल मीडिया एक्सवर त्यांनी उपग्रहाचे फोटो टाकले. त्यानंतर त्याचे मजाक उडवणे सुरु झाले. सोशल मीडियावर युजर त्याला पाण्याची टाकी म्हणत आहे. तसेच त्या उपग्रहाच्या फोटोसोबत पाण्याच्या टाकीचा फोटोही शेअर करत आहे.

सोशल मीडियावर कमेंट

शहबाज शरीफ यांच्या ट्वीटवर उत्तर देताना एका युजरने लिहिले की, ‘हॅलो शहबाज भाई, मोटर बंद कर दो। अब भर गया, पानी पूरा पड़ोस तक आ रहा है।’ आणखी एका युजरने पाण्याच्या टाकीचा फोटो शेअर केला आहे. त्यात सेम टू सेम म्हटले आहे. एका युजरने तर कोणाची पाण्याची टाकी चोरुन आणली? असा प्रश्न विचारला आहे.

शहबाज शरीफ यांनी उपग्रहाचा फोटो शेअर करत त्याला देशासाठी अभिमानाचा विषय असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानने चीनच्या जिउक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरुन आपला पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल (EO-1) उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षपण केले. त्यांच्या या पोस्टवर परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी अभिनंदन करत अवकाश तंत्रज्ञानात पाकिस्तानचे महत्व वाढत असल्याचे म्हटले.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकाच वेळी स्वातंत्र झाले. परंतु भारताच्या इस्त्रो या संस्थेने अनेक उपग्रह लॉन्च केले. मंगळापर्यंत मजल मारली. चंद्रावर पाऊल ठेवले. विदेशातील उपग्रह सोडून देशाला उत्पन्न मिळवून दिले. एकाच वेळी शंभरापेक्षा जास्त उपग्रह सोडण्याचा विक्रम इस्त्रोने केले. त्यावेळी पाकिस्तान आपला पहिला उपग्रह विदेशाच्या मदतीने बनवत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.