आधार कार्डवर कर्ज उपलब्ध : कधी कधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. यावेळी आरोग्याची किंवा शिक्षणासाठी निधीची गरज असते. अशा स्थितीत तत्काळ पैशाची व्यवस्था करणे आवश्यक असते. तुम्हीही अशा परिस्थितीत असाल तर तुमच्या आधार कार्डद्वारे तुम्ही 2 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहज मिळवू शकता. हे अनेकांना माहीतही नसेल, पण तुम्हाला 2 लाखांचं कर्जड मिळू शकते.
आधार हे भारत सरकारने जारी केलेले एक ओळखपत्र आहे. ते आता केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा राहिलेला नाही. त्याच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते, जे तुम्ही तुमच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी हे कर्ज विशेषतः फायदेशीर आहे.
आधार कार्डवर कर्ज मिळणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही दीर्घ प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
प्रथम तुम्ही आधार कार्डवर कर्ज देणारी बँक, NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी) किंवा डिजिटल कर्ज ॲप निवडा.
त्यानंतर तुम्हाला संबंधित प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट किंवा ॲपला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना, तुमची वैयक्तिक माहिती आणि कर्जाची रक्कम याबाबतची माहिती द्या.
अर्ज प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. याच्या मदतीने तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा सहज पडताळता येईल.
काही प्रकरणांमध्ये, बँका किंवा कर्ज पुरवठादार तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी पॅन कार्ड, सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट यांसारखी इतर कागदपत्रे देखील मागू शकतात.
एकदा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, कर्ज मंजूर केले जाईल आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
आधारवर आधारित कर्ज कोणाला मिळू शकते?
भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
स्थिर उत्पन्नाचे साधन असावे.
क्रेडिट स्कोअर चांगला असावा.
आधार कार्डावरील कर्जाचे फायदे
जलद प्रक्रिया:
कर्ज मंजूरी आणि रक्कम हस्तांतरण फार कमी वेळात होते.
अनेक कागदपत्रांशिवाय:
आधार कार्ड आणि काही मूलभूत कागदपत्रांसह कर्ज उपलब्ध आहे.
लवचिक परतफेड पर्याय:
EMI द्वारे कर्जाची परतफेड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कमी व्याजदर:
व्याजदर इतर पर्यायांपेक्षा कमी असू शकतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
फक्त विश्वसनीय बँक किंवा NBFC कडूनच कर्ज घ्या.
तुमच्या पेमेंट क्षमतेचे मूल्यांकन करा आणि तुम्ही वेळेवर EMI परत करू शकता याची खात्री करा.
अधिक पाहा..