Jio Coin Reliance Jio: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Jio Platformsने अलीकडेच इंटरनेट टेक्नोलॉजी कंपनी Polygon Labs सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. JioCoinची इंटरनेटवर तुफान चर्चा आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर होत आहेत. अनेक युजर्सनी ट्विटरवर JioCoin चे फोटो शेअर केले आहेत, तर कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. बिटिनिंगचे सीईओ काशिफ रझा यांनीही ही माहिती शेअर केली आहे.
Jio Coin म्हणजे काय?JioCoin चा वापर मोबाईल रिचार्ज किंवा रिलायन्स गॅस स्टेशनवर खरेदी यांसारख्या सेवांसाठी केला जाऊ शकतो. ॲप्समध्ये जितके जास्त युजर्स असतील, तितके जास्त Jio Coin ते कमवू शकतात. हे टोकन Web3 वॉलेटमध्ये साठवले जाईल. Jiocoin वापरून युजर्स अनेक ऑफर्सचे फायदे मिळवू शकतात. आत्तापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.