राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गंगापूर विधानसभेचे उमेदवार सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. सतीश चव्हाण यांची विधानपरिषदेची आमदारकी रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेले पत्र पक्षाने माघारी घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेल्या पत्रामुळे सतीश चव्हाण यांचा अजितदादांच्या पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Pune News : विमानतळाच्या धावपट्टीचा वर्षभरात विस्तार होणार - मुरलीधर मोहोळकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा वर्षभरात विस्तार होणार असल्याची माहिती दिली. तसंच पुण्याचा जगभरातील शहरांशी ‘कनेक्ट’ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लोहगाव आंतराराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. त्यानुसार जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी आवश्यक भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.
Ajit Pawar Live News : उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलं साईबाबांचं दर्शनराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलं. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नव संकल्प शिबिर सुरू होणार आहे. यापूर्वी अजितदादांनी साई दर्शनाला हजेरी लावली. कुठलेही चांगले काम करण्याआधी देवदर्शन घेण्याची आपली परंपरा असल्याची प्रतिक्रिया अजितदादांनी साई दर्शनानंतर अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे भाजपानंतर राष्ट्रवादी शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचं आज शिर्डीत अधिवेशनराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आज शिर्डीत अधिवेशन होत आहे. भाजपनंतर राष्ट्रवादीने देखील पक्षाचं अधिवेशन शिर्डीत घेण्यास प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजच्या या अधिवेशनात मागील काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
MP Vishal Patil : शक्तीपीठ महामार्गातून सांगली वगळाशक्तीपीठ महामार्गातून ज्या प्रमाणे कोल्हापूर वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळावं, ही सरकारला शेवटची विनंती आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करावा लागेल, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणीसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका अंतर्गत कारवाई करत वाल्मिक कराडला खंडणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याचे वकिलांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
Santosh Deshmukh Murder Case : 6 आरोपींना 'मकोका'च्या विशेष न्यायालयात हजर करणारमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाीतल 6 आरोपींना आज बीडमधील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या सहा आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मकोका विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे.