KAR vs VID : स्मरण रवीचंद्रनची शतकी खेळी, कर्नाटकाच्या अंतिम सामन्यात 348 धावा, विदर्भ जिंकणार?
GH News January 18, 2025 09:09 PM

विजय हजारे स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्नाटकाने विदर्भासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्नाटकाने बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 348 धावा केल्या. कर्नाटकासाठी स्मरण रवीचंद्रन याने सर्वाधिक शतकी खेळी केली. तर विकेटकीपर क्रिष्णन श्रीजीथ आणि अभिनव मनोहर या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे कर्नाटकाला 348 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता विदर्भ या धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय हजारे ट्रॉफी उंचावणार की कर्नाटकाचे गोलंदाज रोखण्यात यशस्वी ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

कर्नाटकची बॅटिंग

स्मरणने 92 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 101 धावांची शतकी खेळी केली. तर अभिनव मनोहर आणि क्रिष्णन श्रीजीथ या दोघांनी निर्णायक खेळी केली तरत कर्नाटकाला 300 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. अभिनवने 42 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. तर क्रिष्णनने 74 बॉलमध्ये 105.41 च्या स्ट्राईक रेटने 1 सिक्स आणि 9 फोरसह 78 रन्स जोडल्या. तर कॅप्टन मयंक अग्रवाल याने 31 धावा केल्या. अनीश केव्हीने 23 धावांचं योगदान दिलं.

देवदत्त पडीक्कलने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर हार्दिक राज आणि श्रेयस गोपाळ हे दोघेनी नाबाद परतले. हार्दिकने 12 आणि श्रेयसने 3 धावांचं योगदान दिलं. विदर्भासाठी दर्शन नळकांडे आणि नचिकेत भुते या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर यश ठाकुर आणि यश कदम या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

विदर्भासमोर 349 धावांचं आव्हान

कर्नाटक प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनिश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, हार्दिक राज, प्रसीद कृष्णा, वासुकी कौशिक आणि अभिलाष शेट्टी.

विदर्भ प्लेइंग इलेव्हन : करुण नायर (कर्णधार), ध्रुव शोरे, यश राठोड, जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, यश कदम, दर्शन नळकांडे आणि यश ठाकूर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.