सलमान खानचा शो 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या ग्रँड फिनाले पार पडत आहे. बिग बॉसच्या 100 दिवसांच्या प्रवासात घरात अनेक सदस्यांची नाती जुळतात. काहींचे प्रेमाचे, काहींचे मैत्रीचे तर काही लोकांचे येथे शत्रूही होतात. 'बिग बॉस 18' हा सीझन 6 ऑक्टोबरपासून सुरू झाला. हा शोला आता तीन महिने झाले आहेत.
' 18'मध्ये सुरुवातीला 18 सदस्यांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात पाच सदस्यांची एन्ट्री करण्यात आली. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून ईशा सिंह आणि चुम दरांग या सदस्यांनी घराचा निरोप घेतला असून आता बिग बॉसच्या घरातून मिश्राने (Avinash Mishra ) एक्झिट झाली आहे.
टॉप 3 कोण?विवियन डिसेना
करणवीर मेहरा
दलाल
बिग बॉसच्या घरात अविनाश मिश्राची अनेक रूप पाहायला मिळाली. त्याची घरात अनेक वेळा भांडणे देखील झाली. मात्र सुरूवातीपासून तो ईशासोबत राहिला. सलमान खानने वेळोवेळी 'वीकेंड का वार'मध्ये अविनाशला त्याच्यातील चुका दाखवल्या आणि अविनाशने आपल्या खेळामध्ये तसे बदलही केले. घरात अविनाशने आपल्या गाण्याने सर्वांना वेड लावले.
अविनाशने ईशा व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात विवियन डिसेना आणि करणवीर मेहराशी चांगली मैत्री केली. अविनाश कायमच आपल्या धमाकेदार गेमसाठी ओळखला गेला आहे. आता 'बिग बॉस 18'च्या घरात तीन सदस्य उरले आहेत. यातील कोणत्या सदस्याचा प्रवास येथे थांबणार आणि शेवटी ट्रॉफी कोण उचलणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.