एकनाथ शिंदे दरे गाव महाराष्ट्र राजकारण: महायुतीमधील पालकमंत्री पदावरुन (Maharashtra Guardian Ministers List) वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. तसेच पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) दरे गावाला निघाल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावात रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी हेलिकॉप्टरने दरे गावाला निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांची भेट घेत पालकमंत्रिपदावरुन चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिघांमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार?, भेटीत कोणता तोडगा निघणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली आहे.
नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एखनाथ शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल, असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.
अधिक पाहा..