पूर्ण क्षमतेने पाणीसाठा मिळणार. तर वीजनिर्मिती साठी शंभर टक्के उपलब्धता. कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी 54 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. सिंचनासाठी उपलब्ध साठा 100% उचलता येणार नाही. मात्र यंदा केवळ चारच महिने आवर्तन चालणार आहे. परिणामी पुरून उरेल इतके पाणी हाताशी आहे. केवळ एप्रिल मे मध्ये आवर्तनाच्या फेऱ्यामधील ताण टाळण्याचे आव्हान पाटबंधारे विभागाला पेलावे लागणार आहे.
नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये लसणाचे दर पुन्हा गगनाला; एक किलोसाठी मोजावे लागणार ६०० रुपये500 रुपये प्रति किलो मिळणारा लसूण आता 600 रुपये किलो.....
लसणाची आवक कमी असल्याने लसणाच्या दरात तेजी कायम.....
लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्याने वाढ....
लसणाचे दर दिवसान दिवस वाढत असून याचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.....
Maharashtra Breaking Live Marathi Headlines : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10 हजारपेक्षा अधिक बांगलादेशीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10 हजारपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक आहेत, त्यात सर्वाधिक बांगलादेशी हे एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज दुपारी १ वाजता भाजप नेते किरीट सोमय्या ह सिल्लोडला भेट देणार आहेत. सिल्लोडमध्ये बांगलादेशी रोहिंग्यां ची संख्या पाच हजारापेक्षा अधिक असल्याचं त्यांचं म्हणणे आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
जन्म प्रमाणपत्रासाठी 10 हजार 68 अर्ज आले आहेत. सिल्लोड तहसीलमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांचे 4 हजार 730 अर्ज आहेत, असा दावा त्यांनी केलाय. सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी सिल्लोड मधील रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या संख्येबाबत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि एमआयएम यांना दोषी धरले असले तरी खरा निशाणा अब्दुल सत्तार यांच्यावरच असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र मिळावे यासाठी एकूण 10 हजार 68 अर्ज आले आहेत. यात एकट्या सिल्लोडमधून ५० टक्के म्हणजे तब्बल 4 हजार 730, तर शहरातून 2 हजार 448 अर्ज आल्याचेही ते म्हणाले.
Ajit Pawar News : अजित पवार यांच्या हस्ते जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे उद्घाटनउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी महिलांनी औक्षण करून केलं अजित पवारांचं स्वागत केलंय. या वेळी फित कापून जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे अजित पवार यांनी उद्घाटन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra Breaking Live Marathi Headlines : शिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय- शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकरशिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय असल्याची टीका शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी केली.जगन्नाथ अभ्यंकर हे नांदेड येथे आले होते.नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मराठवाडा विभागीय बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी हजेरी लावली.
एसटी बसचा अपघात, ट्रकला दिली मागून धडकएसटी बस ची ट्रकला मागून धडक, ६ ते ७ प्रवाशी जखमी... मेहकरवरून संभाजीनगर कडे जात होती बस...
ब्राम्हण चिकना गावा जवळील घटना...
जखमी प्रवाशांवर बिबी येथील रुग्णालयात उपचार सुरू...
चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती...
बिबी पोलीस घटनास्थळी दाखल...
Maharashtra Breaking Live Marathi Headlines : आज दर्यापूर शहर बंदची हाक, चिमुकल्या मुलीवर अत्याचाराचा निषेधअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात तिन दिवसात दोन चिमुकली अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहर बंदचे आवाहन सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे, दोन्ही घटनेतील नराधम आरोपीवर कठोर कारवाई व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दर्यापूरकर जनता आक्रमक होण्याची शक्यता आहे तर सकाळी 10 वाजता दर्यापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे, दोन दिवसापूर्वी येवदा गावात सुद्धा तीन वर्षे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ येवदा बंदच होतं आज दर्यापूर शहर बंद करून सर्व दुकाने बंद करून या घटनेचा निषेध नोंदवणार आहे
Akola News : अकोल्यात जन आक्रोश मोर्चाअकोल्यातल्या जन आक्रोश मोर्चाला मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेशअण्णा धस यांची राहणार अनुपस्थिती. मनोज जरांगे आणि सुरेश धस हे दोघेही अकोल्यातल्या आजच्या जन आक्रोश मोर्चाला उपस्थित राहणार नाहीये..
दरम्यान, अकोल्यात आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा निघणारेये. सर्वधर्मीय व सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे या जन आक्रोश मोर्चाच आयोजन. मनोज जरांगे आणि सुरेश धस या मोर्चाला अनुपस्थित राहणारेय. मात्र, कुमारी वैभवी संतोष देशमुख आणि तिचा भाऊ धनंजय देशमुख हे अकोल्यातल्या मोर्चात सहभागी होणारेय.
दरम्यान, दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीसाठी अकोल्यात आज दुपारी 2 वाजता निघणार आक्रोश मोर्चा. वैभवी संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख करणार मोर्चाला मार्गदर्शन आणि नेतृत्व.
kokan news : कोकणातील लाल मातीत स्ट्रॉबेरीराज्यात महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोकणात देखील आता स्ट्रॉबेरी होऊ शकते. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यात उत्कृष्ट स्ट्रॉबेरी शेती साहिल पेठे नामक शेतकऱ्याने केलीय.दापोली कोळथरे येथील साहिल पेठे या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी.प्रयोग केलाय.कोकणातील लाल मातीत सुद्धा चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते हे यातून सिद्ध झाले आहे तसेच महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षा अधिक गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरी कोकणातील लाल मातीत होऊ शकते असा प्रयोग दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वीच केला आहे.
Maharashtra Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील ९३ टक्के शेतकरी रब्बी हंगामातील पीक कर्जापासून वंचितरब्बी हंगाम संपत आला आहे, तरी केवळ ७ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे, जिल्ह्यात ६९ हजार २०० शेतकऱ्यांना ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र अद्याप केवळ ४ हजार ७३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याने जिल्ह्यातील ९३ टक्के शेतकरी रब्बी हंगामातील पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत, शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकावर फौजदारी दाखल करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल रिंढे यांनी दिला आहे...
jayant patil news : गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर सडकून टीकाभाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. अडीच वर्ष जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते,पण सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं,असा सवाल करत जयंत पाटलांना आर आर पाटील यांचा मुलगा आमदार झालं याचं दुःखणे अधिक आणि आपला मुलगा आमदार झाला नाही,याचा टेन्शन आहे. त्यांच्या प्रमाणे आर आर पाटलांच्या बरोबर असणाऱ्या अनेक नेत्यांना देखील,आपला मुलगा आमदार झाला नाही,याचं दुखणं आहे, पण तुमची लायकी आणि तुमची क्षमता यामुळे तुमची मुलं,कशी आमदार होणार,असा टोला देखील आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.
sangli News : तुतारीचा निनाद आणि गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीकातुतारीही आपल्या पारंपारिक वाद्य आहे,पण एका माणसामुळे ती किती बदनाम होऊ शकतं,ते आपण बघितलं,अश्या मिश्कील शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.सांगलीतील समस्त धनगर समाजाच्यावतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्या दरम्यान बोलताना पडळकरांनी ही टीका केली आहे.आमदार पडळकर हे भाषणाला उभे राहताच तुतारीचा निनाद सुरू झाला,यावर मिश्कीलपणाने गोपीचंद पडळकरांनी तुतारीच्या निनादावरून शरद पवारांवर हा अप्रत्यक्ष निशाणा साधला.
Maharashtra Live Update : कंटेनर-आयशर ट्रकचा अपघातगेल्या काही दिवसांपासून नगर-मनमाड महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरु असून येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोक नाक्या जवळ भरधाव येणा-या आयशर ट्रक ने गतीरोधका जवळ अचानक ब्रेक दाबल्याने मागवून येणारा कंटेनर त्यावर धडकला असता आयशर ट्रक पुढे जाऊन पलटी झाला तर कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन त्या चालक अडकला त्याला बाहेर काढण्यासाठी अखेर जेसीबीची मदत घेण्यात आली,यावेळी तातडीने चालकाला येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.
Maharashtra Breaking Live Marathi Headlines : गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळलेराज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलंय. एका वर्षासाठी एक लाख रुपये १० महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून सुमारे ८०० जणांना ३५ कोटी रुपयांचा गंडा घातला.
Raigad news : यगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती, शिवसैनिकांमध्ये जल्लोषरायगडचे पालकमंत्री पद शिवसेना उपनेते ना भरत गोगावले यांना मिळावे यासाठी रायगडमधील शिवसैनिक गेल्या पाच वर्षांपसून आग्रही आहेत. रायगडमधील शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या तीन आमदारांची देखील हिच मागणी आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार आदिती तटकरे यांना पालक मंत्री पद जाहिर झाल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. याचा उद्रेक होऊन शिवसैनिकांनी शनिवारी मध्यरात्री मुंबई गोवा महामार्ग रोखुन धरत निदर्शन केली तर रविवारी सकाळीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजिनामे देखील दिले. ना. गोगावले यांना रायगडचे पालक मंत्री घोषित करा यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले होते. याची दखल घेत, शिवसैनिकांच्या भावनांचा मान राखत शासनाने रायगडच्या पालक मंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. विशेष शासन निर्णय काढत शासनाचे उपसचिव दिलिप देशपांडे यांनी हे स्थगिती आदेश जारी केले आहेत. पुढील आदेशापर्यंत रायगडचे पालकमंत्री पदाला हि स्थगिती लागू रहाणार आहे. शासनाच्या या स्थगिती आदेशामुळे शिवसैनिकांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ना. गोगावले यांचे काम आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन गोगावले यांना पालक मंत्री जाहिर करावे अशी मागणी आता केली जात आहे.
Agro News : पशुधनाच्या भावात सातत्याने वाढ दुधाचे दर मात्र जैसे थेएकीकडे पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असताना दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या दुधाला देखील योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.धाराशिव जिल्ह्यात दुधाला 28 ते 30 रुपये भाव आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे सरकारने प्रति लिटर दुधाला 60 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादकातून होत आहे. चारा,कडबा महागला आहे.त्यात दूध संकलन करून दूध डेअरीला पोहचवले जाते.पण त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही.शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे दुधाला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे
Jalgaon Live News : हाता तोंडाशी आलेला घास हिरावला बळीराजावर पुन्हा आर्थिक संकटजळगावच्या शिरसोली गावातील शेत शिवार परिसरात असलेल्या भिका बारी यांच्या दोन एकर शेतात वन्य प्राण्यांनी दादर पिकाचे मोठे नुकसान केले आहे. रब्बी हंगामात आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी बारी कुटुंबीयांनी त्यांच्या दोन एकर शेतामध्ये दादर पिकाची लागवड केली होती. येत्या पंधरा दिवसात या पिकातून भरघोस उत्पन्न देखील मिळणार होतं. मात्र वन्य प्राण्यांनी शेतात धुमाकूळ घातला असून संपूर्ण तयार असलेले दादरचे उभे पिक आडवे करून या पिकावरील कनिस खाऊन वन्यप्राणी पसार झाले आहे. यामुळे भिका बारी यांच्या दोन एकर शेतावरील दादर पिकाची मोठे नुकसान झाले असून वनविभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी अद्यापही शेताकडे आलेले नाही. यामुळे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशीच मागणी बळीराजांनी केली आहे.
Nanded News Update : मासे पकडण्यासाठी गेलेल्या एक तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तर दुसरा बेपत्तानांदेडच्या मुखेड तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एक तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान नांदेड मुखेड येथील गडग्याळवाडी येथील अजित विश्वाबंर सोनकांबळे व संतोष हणमंतराव मामीलवाड हे दोन तरूण शनिवारी रात्री साडे दहा वाजता गडग्याळवाडी येथील तलावात जाळं घेऊन मासे पकडण्यासाठी गेले होते. दोघेही कपडे, चप्पल आणि मोबाईल काढून तळ्याच्या काठावर ठेऊन पाण्यात उतरले होते. दरम्यान मासे पकडत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने, त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरा बेपत्ता झाल्याचं पुढे आलं आहे.
पंकजा मुंडे, मंत्रीमी बीडची मुलगी आहे, मला बीडचा पालकमंत्रिपद मिळालं, असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती. Akola News :ठाकरेंच्या शिवसेना अकोला जिल्हाप्रमुखपदी मंगेश काळेउद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अकोला जिल्हाप्रमुख पदी मंगेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोपाल दातकर यांचीसुद्धा जिल्हा प्रमुख पदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगेश काळे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत व शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख उपस्थित होते. मूर्तिजापूर विधानसभा व अकोट विधानसभा जिल्हाप्रमुख म्हणून मंगेश काळे असतील तर अकोला पूर्व विधानसभा, अकोला पश्चिम विधानसभा व बाळापूर विधानसभा जिल्हाप्रमुख म्हणून गोपाल दातकर यांची फेरनियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केलीये. यापूर्वी आमदार नितीन देशमुख हे जिल्हा प्रमुख होते. मात्र ते दुसऱ्यांदा बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले व त्यांना पक्षाने शिवसेना उपनेते केल्याने त्यांच्या जागी मंगेश काळे यांची नियुक्ती करण्यात आलीय. मंगेश काळे हे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर गोपाल दातकर हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.
Buldhana News : दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळा , संजय गायकवाड यांनी दिल्या सूचनामोताळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर टेकाळे दांपत्याच्या घरावर जबर दरोडा पडला होता, त्या दरोड्यामध्ये गुन्हेगारांनी सोने, चांदी, रोख रक्कम वगैरे लुटून नेले तसेच दोन्ही दाम्पत्यांना जबर मारहाण केली यामध्ये डॉक्टरांच्या पत्नी डॉ.माधुरी टेकाळे यांचा गळा दाबून मारहाणीत मृत्यू झाला, त्यामध्ये डॉ गजानन टेकाळे हे गंभीर जखमी असून त्यांना जळगाव खांदेश येथे त्यांना उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे..बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी दाभाडी येथे संपूर्ण पोलीस प्रशासना समवेत जाऊन संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली,तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ या दरोड्यातील आरोपीचा शोध घेण्यात यावा अश्या सूचना दिल्या..पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या दिशेने तीन टीम रवाना केल्या तसेच जळगाव येथील डॉक्टरांशी देखील फोनवरून चर्चा करून डॉ. गजानन टेकाळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची प्रतिक्षाधाराशिव जिल्ह्यातील 1 लाख 80 हजार शेतकरी केवायसी पुर्ण करुनही अनुदान मिळण्यापासून वंचित आहेत तर लोहारा व उमरगा तालुक्यातील 86 कोटी 52 लाख रुपयांच्या अतिवृष्टीच्या प्रस्तावाची मान्यता मंञालयात अडकली आहे.गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील पिकांचे 33 टक्यापेक्षा अधिक नुकसान झाले नियमानुसार जिल्हा प्रशासनाने धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 80 हजार 786 बाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख 59 हजार 887 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 221 कोटी 81 लाख नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला होता त्यामध्ये धाराशिव कळंब वाशी व परंडा ता चार तालुक्याचा समावेश होता राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रीया पुर्ण केली ही प्रक्रीया पुर्ण होवुन तीन आठवडे झाले तरीही शेतकऱ्यांना अद्यापही ही अतिवृष्टी अनुदान मिळाले नाही त्यामुळे अनुदान लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.
yavatmal News : यवतमाळात महिलांमध्ये बंदुकीची क्रेझ,15 महिलांकडे बंदुक असल्याची नोंदआत्मसंरक्षणासाठी 796 जणांनी शस्त्र परवाना घेतला आहे.गृह विभागाने 597 शस्त्र परवान्याचे नूतनीकरण केले असून उर्वरित प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.यवतमाळ जिल्ह्यात 15 महिलांकडे बंदूक असल्याची नोंद आहे.यामुळे महिलांतही बंदुकीची क्रेझ असल्याचे दिसत आहेत.
Ajit pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. जालना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.त्याचबरोबर माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे..
Santosh Deshmukh case : अकोल्यात आज आक्रोश मोर्चाबीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात आक्रोश मोर्चा. सर्वधर्मीय व सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चाच आयोजन. दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीसाठी निघणार मोर्चा. वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील करणार मोर्चाला मार्गदर्शन आणि नेतृत्व.
Beed Live Update : वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणीवाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मीक कराडचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी केज न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलाय. यात १८ जानेवारी रोजी सुनावणी होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळं आज कराडच्या जामीन अर्जावरील केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे..त्यामुळं या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे..