LSG New Captain: लखनौ सुपर जायंट्सने IPL 2025 साठी जाहीर केला नवा कर्णधार, Rishabh Pant...
esakal January 20, 2025 10:45 PM

Lucknow Super Giants named Rishabh Pant as new captain : लखनौ सुपर जायंट्स संघाने इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी पर्वासाठी कर्णधार जाहीर केला आहे. आणि LSG चे मालक संजीव गोएंका यांच्यात मागील पर्वात झालेल्या राड्यानंतर लखनौ फ्रँचायझीचा नवा कर्णधार कोण असेल, याची सर्वांना उत्सुकता होती. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये याचे उत्तर मिळालेही होते, परंतु अधिकृत घोषणा आज झाली. आयपीएल २०२५ हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्सने कर्णधारपदी ऋषभ पंतच्या नावाची घोषणा केली.

ऋषभ पंतला संघाने आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लावून संघात सामील करून घेतले होते. ऋषभला एलएसजीने २७ कोटी रूपयांत करारबद्ध केले. केएल राहुलला संघातून रिलीज केल्यानंतर एलएसजीला एका विकेटकीपर कर्णधाराची आवश्यकता होती, त्यासाठी लखनौने ऋषभवर सर्वाधिक बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

आयपीएल २०२४ च्या हंगामात संघमालक संजीव गोएंका व पुर्वीचा कर्णधार यांच्यात वाद पाहायला मिळाले होते. सामना संपताच गोएंका हे सर्वांसमोर कर्णधारावर संतापलेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर २०२५ आयपीएल हंगामाच्या लिलाव आधी लखनौने केएल राहुलला संघातून केएल राहुलला रिलीज केले.

त्यानंतर यावर आता संघमालकाने कारण स्पष्ट केले आहे. कर्णधारपदाची घोषणा करताना दिलेल्या मुलाखती दरम्यान गोएंका म्हणाले. सामना हरणे, चुका करणे साहाजिक आहे. पण तुम्ही त्या चुकांमधून शिकायला हवे आणि सुधारणा करायला हवी, तुम्ही सोपे सोपे सामने गमावू शकत नाही."

ऋषभबद्दल बोलताना गोएंका यांनी त्याचा संघाचे 'भविष्य' असा उल्लेख केला. याचे स्पष्टीकरण देताना गोएंका म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे ऋषभ अजून १०-१२ वर्ष खेळेल, ज्यामध्ये तो संघासाठी ५ ते ६ आयपीएल विजेतेपद जिंकेल. सध्या मुंबई-चेन्नईची चर्चा होते व यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्मा व एम एस धोनी अशी नावे घेतली जातात. १०-१२ वर्षानंतर एम एस धोनी, रोहित शर्मा व ऋषभ पंत अशी नावे घेतली जातील.

LSG new Captain लखनौ सुपर जायंट्स - (शिल्लक रक्कम - १० लाख)

रिटेन केलेले खेळाडू - निकोलस पूरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयंक यादव (११ कोटी), मोहसीन खान (४ कोटी) आणि आयुष बदोनी (४ कोटी)

लिलावातून घेतलेले खेळाडू - ऋषभ पंत (२७ कोटी), आवेश खान (९.७५ कोटी), डेव्हिड मिलर (७.५० कोटी), अब्दुल सामद (४.२० कोटी), मिचेल मार्श (३.४० कोटी), एडेन मार्करम (२ कोटी), आर्यन जुएल (३० लाख), आकाश दीप (८ कोटी), शाहबाज अहमद (२.४० कोटी), मॅथ्यु ब्रित्झके (७५ लाख),शामर जोसेफ (७५ लाख), एम सिद्धार्थ (७५ लाख), अर्शिन कुलकर्णी (३० लाख), राजवर्धन हंगारगेकर (३० लाख), युवराज चौधरी (३० लाख), प्रिन्स यादव (३० लाख),आकाश सिंग (३० लाख) दिग्वेश सिंग (३० लाख), हिंमत सिंग (३० लाख), आर्यन जुयाल (३० लाख)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.