भारत आणि इंग्लंड संघात बुधवारपासून (२२ जानेवारी) टी२० मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांनी सरावालाही सुरुवात केली असून दोन्ही संघ सज्ज आहेत.
या मालिकेतील पहिला सामना कोलकातामधील ऐतिहासिक स्टेडियमवर इडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. हे मैदान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासाठीही खास आहे. याबाबत त्यानेच बीसीसीआयशी बोलाताना सांगितले आहे.
सूर्यकुमार यादव २०१४ ते २०१७ दरम्यान आयपीएलमध्ये कोलताका नाईट रायडर्सकडून खेळला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हे मैदान खास राहिले आहे. त्याने कोलकाता संघाकडून गौतम गंभीरच्या नेतृत्वात पदार्पण केले होते. आताभारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
याबाबतही भाष्य केले आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो सुरुवातीला बंगालीमध्ये काही वाक्य बोलत आहे. त्यावेळी तिथून जात असलेल्या अर्शदीप सिंगला त्याने भालो पाजी? असा प्रश्नही विचारला. ज्यावर अर्शदीपने भालो असं उत्तरही दिले.
त्यानंतर सूर्यकुमारने सांगितले की तो पहिल्यांदा इथे आला होता, तेव्हा त्याला खूप जणांनी बंगालमधील प्रसिद्ध डेझर्ट असलेलं मिष्टी दोई खाऊ घातलं होतं. आजही इथे आल्यानंतर ते खात असल्याचे त्याने सांगितले.
याशिवाय सूर्यकुमार असंही म्हणाला की जेव्हा २०१४ मध्ये कोलकाताकडून खेळत होता, तेव्हा त्याने हा विचार कधी केला नव्हता की एक दिवस तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. पण तो आता भारताचा कर्णधार असल्याने आणि ऐतिहासिक मैदानात नेतृत्व करणार असल्याने आनंदी असल्याचेही त्याने सांगितले.
सूर्यकुमार शेवटी गंभीरबद्दलही बोलला. त्याने सांगितले की कोलकातामध्ये तो गंभीरच्या नेतृत्वात खेळला होता. त्याने सांगितले की तो गंभीरकडून अनेक गोष्टी शिकला आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघातील पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघसंजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर