VTS App : एसटी कुठे आली? आता कळणार व्हीटीएस ॲपवर; बस स्थानकावर येण्याची अचूक वेळही समजणार, हे ॲप कसं करणार काम?
esakal January 21, 2025 07:45 PM

या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गाड्यांची वेळ, ठिकाण, गाडी थांबणयाचे ठिकाणही समजणार आहे. ‘रोस मार्टा ’कंपनीकडून ‘रूट मार्पिंग’ पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांगली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (Maharashtra State Transport Corporation) सामान्य माणसाच्या हिताचे कार्यक्रम राबवलेत. महिलांना बस प्रवासासाठी तिकिटात सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. आता प्रवाशांना ‘आपली बस कोणत्या ठिकाणी आहे’ हे देखील कळणार आहे.

एस. टी. तिकिटावर (ST Ticket) असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्थानकावर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. ना व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम (Vehicle Tracking System) बसवल्याने ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे हे समजणार आहे. जिल्ह्यातून रोज साधारण १ लाख ८३ हजार १६० प्रवासी प्रवास करतात.

९६ हजार ५९५ महिला प्रवासी आहेत. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गाड्यांची वेळ, ठिकाण, गाडी थांबणयाचे ठिकाणही समजणार आहे. ‘रोस मार्टा ’कंपनीकडून ‘रूट मार्पिंग’ पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस कोणत्या ठिकाणी आहे, हे कळत नाही. बस नेमकी कधी येणार, थांब्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना माहीत नसल्याने ताटकळत राहावे लागते. तेव्हा, या ‘व्हीटीएस’ ॲपची प्रवाशांना मदत होणार आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, सांगली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.