Chhava : डोक्यावर पदर, कपाळाला कुंकू आणि हातात कवड्यांची माळ ; छावा सिनेमातील महाराणी येसूबाई पाहिल्या का ?
esakal January 21, 2025 07:45 PM

Bollywood Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अभिनेता चा आगामी बिग बजेट सिनेमा छावाची. आज छावाचा ट्रेलर रिलीज होणार आहे पण त्या आधीच या सिनेमातील रश्मिका मंदानाचा लूक रिव्हील करण्यात आला. सोशल मीडियावरील तिचं लूक पोस्टर चर्चेत आहे.

रश्मिका या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी राणी येसूबाई यांची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावरील पोस्टर, त्यातील रश्मिकाचा लूक तिचं दिसणं याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कपाळाला भलंमोठं कुंकू, डोक्यावर पदर, भरजरी नऊवारी साडी, पारंपरिक मराठी दागिने या लूकमध्ये रश्मिका दिसतेय. शेअर केलेल्या दोन्ही पोस्टरमध्ये दोन लूक दिसत आहेत. पहिल्या लूकमध्ये राज्याभिषेकाचा दृश्य दिसत आहेत तर दुसऱ्या पोस्टरमध्ये तिचा दुखी चेहरा आणि छत्रपती संभाजी राजांची प्रतीक्षा, स्वराज्याची असलेली चिंता या फोटोमध्ये दिसतेय.

या पोस्टरला "प्रत्येक महान राजाच्या मागे अतुलनीय शक्तीची राणी उभी असते." दिवस कॅप्शन देण्यात आलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये रश्मिकाच्या लूकचं कौतुक केलं. "श्री सखी राज्ञी जयती ❤️ महाराणी येसुबाई सरकार!.." अशी कमेंट एकाने केलीये. तर अनेकांनी रश्मिकाबरोबरच मृणाल ठाकूरच्या नावाचा विचार व्हायला हवा होता अशी कमेंट केली आहे.

14 फेब्रुवारी 2025 ला हा सिनेमा रिलीज होतोय. लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रश्मिका आणि विकी बरोबरच अक्षय खन्नाचीही मुख्य भूमिका आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.