MHADA Lottery: मुहूर्त ठरला! तयारीला लागा; फेब्रुवारीत निघणार म्हाडाच्या घरांची लॉटरी
Saam TV January 21, 2025 07:45 PM

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या २२६४ घरांसाठीची लॉटरी फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. यापूर्वी ३१ जानेवारीला ही लॉटरी लागणार होती. मात्र, आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. (MHADA Lottery)

ने घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता लॉटरी कधी लागणार याबाबत माहिती समोर आली आहे.

म्हाडा कोकण मंडळानं २२६४ घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते. यामध्ये ५९४ सदनिका, १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेत ८२५ फ्लॅट, कोकण मंडळाच्या ७२८ फ्लॅट विक्रीसाठी आहेत. कोकण मंडळाच्या २२६४ घरांची लॉटरी ३१ जानेवारीला लागणार होती.मात्र, ही लॉटरी लांबणीवर गेली आहे. म्हाडाच्या घरांचा निकाल मोबाईलवर एसएमएस आणि ई-मेलद्वारे येईल. (MHADA Lottery Date)

म्हाडाच्या घरांसाठी अर्जप्रक्रिया ६ ला संपली होती. त्यानंतर म्हाडाकडून अर्जदारांची यादी प्रकाशित केली होती. म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी ६ लाख रुपये उत्पन्न निश्चित केले होते. तर अल्प उत्पन्न गटासाठी ९ लाख रुपये आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १२ लाखांचे उत्पन्न निश्चित केले होते.

मुंबईत स्वतः चे घर घ्यायची अनेकांची इच्छा असते. मुंबईत घर घेणे हे मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे म्हाडा परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करुन देते. यासाठी लॉटरी काढली जाते. दरवर्षी म्हाडा काही विक्रीसाठी उपलब्ध करत असते. यावर्षीही त्यांनी १२०० घरांसाठी सोडत काढली आहे. आता फेब्रुवारी महिन्यात ही सोडत निघणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.