Maharashtra Live Update : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील ड्रग्ससाठा होणार नष्ट
Saam TV January 21, 2025 07:45 PM
Maharashtra Live Update : पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पूणे तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra Live Update : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील ड्रग्सचा साठा होणार नष्ट

फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एमडी नष्ट करण्याचे नियोजन पुणे पोलिसांनी केलं सुरू

मागील वर्षी अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट पुणे पोलिसांनी केलं होतं उघडकीस

जप्त केलेल्या मेफेड्रोनच्या (एमडी) साठ्याची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होळी

गेल्या वर्षी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यासह जिल्ह्यात, दिल्ली आणि सांगली येथे छापे टाकून १८०० किलो एमडी केले होते जप्त

राज्यातील पोलिसांनी केलेली ही आजवरची विक्रमी कारवाई

या प्रकरणात पुणे पोलिसांनी पंधराहून अधिक आरोपींना अटक

राज्यातील सरकार शापित-निलेश लंके

राज्यात पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये धुसपुस पाहायला मिळत आहे... याबाबत बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, हे सरकारच शापित आहे... महायुतीतीलच एका बड्या मंत्र्याने एका पत्रकारांसोबत खासगीत बोलताना हे वक्तव्य केल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे... तसेच ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेला लोकांना पाडायचं आणि पडलेल्या नेत्यांना निवडून आणायचं हे या सरकारने केलं असं निलेश लंके यांनी म्हटल आहे... तर ईव्हीएमच्या जोरावर निवडलेल्या सरकार टिकत नसतं असा टोला लंके यांनी लगावला आहे.

Maharashtra Live Update : कोल्हापूर -पाणी कनेक्शन वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला

बिल भरले नसल्याने कनेक्शन बंद करायला गेलेल्या पथकावर हल्ला

मंगळवार पेठ परिसरातील घटना

मीटर रीडर उमेश साळुंखे याना मारहाण

महापालिकेचे कर्मचारी भीतीच्या छायेत

दत्ता खाडेमी आणि वाल्मीक कराड एकाच जातीचे असल्याने मला यात ओढलं जात आहे. Akola News : अवैध सलाइनचा साठा जप्त

अकोल्यातल्या जीएमडी मार्केटमध्ये एका गोदामातून मोठ्या प्रमाणात अवैध सलाइनचा साठा जप्त करण्यात आलाय.. अन्न औषध प्रशासनाने अकोल्यातल्या GMD मार्केटमधील या गोदामात छापा टाकलाये.. यामध्ये 1 हजार 164 सलाइनचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे.. साधारणता एका बॉक्समध्ये 30 - 40 सलाइन आहेत. या साठ्याची किंमत अंदाजे 9 लाखांवर आहे. जीएमडी मार्केटमध्ये हा अवैधरीत्या सलाइनचा साठा ठेवण्यात आलेला होता.... एवढ्या मोठ्या प्रमाणात या सलाईनचा साठ्याची विक्री कशी होते? असा प्रश्न उपस्थित होता आहे..

दरम्यान, हा सलाइनचा साठा हैदराबाद कंपनीचा आहे. काही दिवसांपूर्वी ट्रकने हा साठा अकोल्यात आणण्यात आला. मात्र, आवश्यक ते परवाने नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे..

Maharashtra Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला. आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार Pune Crime : पुण्याच्या शिरुर गोळीबाराच्या घटनेने हादरलं

चार वर्षापुर्वीचा जुन्या वादाचा राग मनात धरुन छातीवर रोखले पिस्तुल

गोळीबाराच्या दहशतीचा थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद

प्रसंगावधान राखत हात हटवल्याने हवेत गोळीबार

गोळीबारात तरुण थोडक्यात बचावला

मी तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत छातीवर रोखलं होतं पिस्तुल

कृष्णा वैभव जोशी असे गोळीबार करणा-या आरोपीचे नाव

Shiv sena : शिंदे सेनेतील वाद टोकाला, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि माजी पालकमंत्री, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद आता वाढत चालला आहे.

काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये झालेल्या नागरी सत्काराच्या वेळेस संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्याबद्दल आता अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तक्रार करणार आहेत.

ही बाब त्यांच्या कानावर टाकणार आहेत. सध्या मी माध्यमांशी बोलणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांना मी याबद्दल सांगणार आणि त्यानंतर मग ते जे म्हणतील त्यानुसार मी पाऊल टाकणार, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी फोनवर बोलताना सांगितले

सैफ अली खानला डिस्चार्ज मिळणार

मागील सहा दिवसांपासून मुंबईचा वांद्रे पश्चिमेकडील लीलावती रुग्णालयात सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहेत. आज सैफ अली खान याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. सैफ अली खान याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान नुकतीच लीलावती रुग्णालयात दाखल झाली असून डिस्चार्ज पेपर प्रक्रिया पार पडल्यानंतर सैफ अली खान याला रुग्णालयातून घरी सोडले जाणार आहे.

भांडुप मधील ड्रीम्स मॉल च्या बेसमेंटला पाण्यात आढळला एका महिलेचा मृतदेह

महिलेचे वय साधारण 30 ते 35 वर्ष

महिलेला मुलुंड मधील जनरल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी केले मृत घोषित

महिलेचा नातेवाईकांचा शोध सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात जाणार

नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात जाणार आहेत. ५ फेब्रुवारीला प्रयागराज येथे जाणार असून तिथे दर्शन घेणार आहे.

सांगलीतुन होणार 30 हजार टन साखर निर्यात..

केंद्र सरकारने निर्यातीसाठी जाहीर केलेल्या दहा लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल पावणे चार लाख टन साखर उपलब्ध झाले आहे. केंद्र सरकारने देशभरात कारखानानिहाय हा कोटा जाहीर केला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ही साखर निर्यात करणे बंधनकारक असल्याचे यासंदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्येच्या निषेधासाठी बोदवडमध्ये मराठ समाजाचे उपोषण

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, खटला जलदगती न्यायालयात चालवा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहे. त्या अनुषंगाने बोदवड येथील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोचनि तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. त्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याकडून विदर्भाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या पूर्णाड फाट्याकडून विदर्भातील जळगाव जामोद कडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूर अवस्था झाली असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची भीती वाढली आहे.

Crime News : ध्वज चौकात तरुणाचा खून, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात एका 27 वर्षीय तरुणाचा चाकू सारख्या हत्याराने भोसकून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, गौरव किरण माने असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli News : शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा प्रसंगी हातात बंदुका घेऊन,गोळ्या घालू - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग विरोधात सांगली मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,अन्यथा प्रसंगी हातात बंदूक घेऊन गोळ्या घालू,असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. कोणत्याही भाविक शेतकरी अथवा वाहनधारकाची मागणी नसताना केवळ आमदार,खासदार आणि ठेकेदारांना देवाच्या नावाखाली जगण्यासाठी भाजपाने हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप देखील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.

Pune : पुणे जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम निकृष्ट दर्जाचे का? ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा अधिकाऱ्यांना प्रश्न

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी सारखेच शिक्षण घेतलेले असते.तरीही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या कामाच्या गुणवत्तेत कमतरता का असते?

आपली यंत्रणा कोठे कमी पडते याचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विचार करून उपाययोजना कराव्यात,' अशी सूचनाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलीय

Beed News : बीडच्या आगर तांड्यावर घरातील वस्तुंना अचानक आग लागत असल्याचा ग्रामस्थांचा दावा

बीडच्या वडवणी तालुक्यातील आगर तांडा येथील तीन घरांमधील वस्तुंना अचानक आग लागण्याचा प्रकार गत तीन दिवसांपासून होत असल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे... घरातील संसारोपयोगी साहित्याला ही आग लागत असून याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.. वारंवार असा प्रकार होत असल्याने येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती वडवणी पोलिसांना झाल्यानंतर या ठिकाणी पोलिस कर्मचार्यांनी पाहणी केली असली तरी आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून तुर्तास तरी या ठिकाणी दहशतीचे वातावरण कायम आहे.. महसूल प्रशासनाच्या अधिकार्यांना देखील याबाबत माहिती दिली आहे.. या आगीच्या गौडबंगालाची चर्चा मात्र परिसरात होत आहे.

Beed Live Update : बीड जिल्ह्यातील तेरा सरपंच आणि 418 सदस्यांना दणका

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील तेरा सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालीय.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांका पासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Maharashtra Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटल अरेस्टचा प्रकार

छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटल अरेस्टचा प्रकार समोर आलाय. पोलीस असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट आणि त्यानंतर हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकलेल्या एकाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोडवले. छत्रपती संभाजीनगरात एका ४५ वर्षीय सुशिक्षित व्यक्तीला दुपारी एक कॉल आला.एका महिलेच्या गुन्ह्यात नाव निष्पन्न झाल्याचे सांगून सहा तास एकाच खोलीत बसवून डिजिटल अरेस्ट केले.७२ तास कुटुंबापासून दूर जाण्यासाठी धमकावून एका हॉटेलवर जाऊन खोली बुक करण्यास सांगितले. मात्र, त्याच वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला ही बाब कळाली आणि त्यांची पुढील आर्थिक,मानसिक त्रासातून सुटका झाली.मात्र,संमोहित करून घराबाहेर निघण्यास सांगून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा नवा प्रकार सायबर गुन्हेगारांनी अवलंबल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ST bus News : रत्नागिरीत एसटीच्या २२९ गाड्या भंगारात

एसटी महामंडळ नवीन तंत्रज्ञान असलेल्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देत असतानाच आयुर्मान संपलेल्या बसेसचे भंगारात केले जात आहे. गेल्या पाच वर्षात रत्नागिरी विभागातून तब्बल २२९ गाड्या भंगारात देण्यात आल्या आहेत.एसटी बसचे आयुर्मान १५ वर्षे निश्चित केले आहे. १५ वर्षानंतर बसेस वापरातून बाजूला काढल्या जातात. तत्पूर्वी गाड्यांचे सुस्थितीत असलेले स्पेअरपार्ट काढून ठेवले जातात. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून दरवर्षी बसेसचे निर्लेखन करण्यात येते. मात्र, सन २०२२-२३ मध्ये एकही बस भंगारा काढण्यात आलेली नाही.

आता वन पर्यटनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना 3 ते 25 हजार रुपये पर्यंतचा होणार दंड Nashik : देशाचे गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

- देशाचे गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

- शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला जावून घेणार बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन

- अमित शाह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन आणि पूजा करणार

- त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावात सहकार परिषदेला देखील अमित शाह लावणार हजेरी

सुधिर मुनगंटीवार मुख्यमंत्री सध्या दावोसला गेले आहेत. ते परत आल्यावर सगळे नेते एकत्र बसून रायगड आणि नाशिकावर निर्णय घेतील Maharashtra Breaking Live Marathi Headlines : जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षांच्या २५० पेक्षा अधिक प्रजाती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षांच्या २५० पेक्षा अधिक प्रजाती आढळल्या आल्यात. विशेष म्हणजे मागील वर्षी गायब असलेले मंगोलिया, रशिया, रफ हे पक्षी यावर्षी आढळून आलेत, मात्र पक्षांची संख्या कमी झाल्याचे यावर्षीच्या पक्षी निरीक्षणामध्ये दिसून आले आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यात दरवर्षी पक्षी कमी झाले की वाढले हे शोधण्यासाठी पक्षी गणना केली जाते. बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायट आणि छत्रपती संभाजीनगर येथील पक्षी अभ्यासकांनी सोनेवाडी, जायकवाडी अभयारण्य, पन्नालालनगर, टाकळी, लांबगव्हाण, दहेगाव, विजापूर, वरखेड, कायगाव टोका, मावसगव्हण, रामडोव्ह, बोट हाऊस येथे पक्षी गणना केली. यात फ्लेमिंगो, कॉमनकूट (वारकरी), स्पॉटबिल (हळदी-कुंकू), पोचार्ड, कार्मोरंट, सिगल, व्हिस्पर टर्न, रिव्हर टर्न, रेड कॅपेड आयबीस, ग्लॉसी आयबीस, ब्लॅक हेडेड आयबीस, ब्राम्ही डक, किंग फिशर, रॉबिन, ब्लॅक विंग स्टील्ट, येलो वेगटेल आदी पक्षी आढळले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पक्षांची संख्या काही प्रमाणात घटली असून मागील वर्षी गायब असलेले मंगोलिया, रशिया, रफ हे पक्षी यावर्षी मात्र आढळले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.