जुनी कार खरेदी करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. जुन्या कार खरेदी करणं सोपं वाटत असलं तरी तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे कोणतेही वाहन खरेदी करताना घाई करू नका. यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
आजकाल बाजारात स्वस्त सेकंड हँड वाहनांना खूप मागणी आहे. नव्या कारव्यतिरिक्त सेकंड हँड कार खरेदी करण्यातही लोकांना रस आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची स्वस्त किंमत. जुन्या कारची किंमत कमी आहे, आणि ती बजेटमध्ये फिट बसते. मात्र, सेकंड हँड कार खरेदी करताना काही तोटे असू शकतात, ज्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करावे लागू शकते.
1. वाहनाची स्थिती
सेकंड हँड वाहनाची नेमकी स्थिती काय आहे, याचा अंदाज बांधणे अवघड आहे. काही वेळा गाडीचे इंजिन, ट्रान्समिशन, ब्रेक आणि इतर मुख्य भागांमध्ये बिघाड होऊ शकतो, जो तुम्हाला दिसत नाही. सखोल तपासणी करूनही त्रुटी आढळून न आल्यास नंतर गाडी दुरुस्त करणे महागात पडू शकते.
2. सर्व्हिस रेकॉर्ड आणि देखभाल
नवीन वाहनांना कार कंपनीची वॉरंटी आणि नियमित सर्व्हिस रेकॉर्ड असते, तर सेकंड हँड वाहनांमध्ये अशी माहिती पूर्णपणे नसते. जुन्या मालकाने वाहनाची योग्य ती काळजी घेतली असेलच असे नाही. वाहनाची योग्य देखभाल न केल्यास त्यातील अनेक भाग लवकर खराब होऊ शकतात.
3. वाहनाचे किलोमीटर रीडिंग
अनेकदा लोक सेकंड हँड वाहनांचे किलोमीटर रीडिंग बदलून घेतात जेणेकरून वाहन कमी धावताना दिसेल. यामुळे वाहन कमी चालवले गेले आहे असा गैरसमज होऊ शकतो. तर प्रत्यक्षात तो अधिक चालवला गेला असून त्याच्या फिटनेसवर परिणाम होऊ शकतो.
4. अपघात आणि ड्रायव्हिंग इतिहास
सेकंड हँड वाहनाच्या मागील मालकाकडून वाहनाचा कधी अपघात झाला आहे की काही गंभीर समस्या आहेत हे उघड केले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. अपघातानंतर वाहनात दोष असू शकतात. यामुळे नंतर मोठा खर्च होऊ शकतो.
5. सुरक्षा आणि रिसेल व्हॅल्यूही
सेकंड हँड वाहनात दोष असेल तर त्याचे रिसेल व्हॅल्यूही कमी होते. याशिवाय गाडीतील सेफ्टी फीचर्स आणि टेक्नॉलॉजी नव्या मॉडेल्सपेक्षा जुनी असू शकते, जी रस्त्यावर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची हमी देत नाही.
6. उच्च देखभाल खर्च
जुन्या वाहनाच्या स्थितीनुसार त्याचा देखभाल खर्चही वाढू शकतो. इंजिन, ब्रेक, टायर आणि बॅटरी सारखे महत्वाचे भाग बदलण्याची आवश्यकता असू शकते. या सर्व गोष्टींची दुरुस्ती आणि रिप्लेसमेंट केल्याने तुमचा खर्च वाढू शकतो, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.