10 पैसे खर्च करून रस्त्यावर धावणार ‘ही’ इलेक्ट्रिक सायकल, 3 वर्ष मेंटेनन्स फ्री
GH News January 21, 2025 08:12 PM

Auto Expo2025: इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये महागड्या लक्झरी वाहनांचे कलेक्शन पाहायला मिळत आहे. तर काही कंपन्या सर्वसामान्यांसाठी इलेक्ट्रिक सायकल घेऊन या एक्स्पोमध्ये पोहोचल्या आहेत. ओयूएनसीने या एक्स्पोमध्ये एक सायकल लाँच केली आहे. ही सायकल बॅटरी आणि पेडल दोन्हीने चालवता येते. कंपनीचा दावा आहे की, ही सायकल सिंगल चार्जमध्ये 60 किलोमीटरची रेंज देऊ शकते. ही सायकल फुल चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात.

सायकलचा खर्च किती?

ओयूएनसीने आपल्या सायकलबाबत दावा केला आहे की, केवळ 10 पैसे प्रति किमी या दराने सायकल चालवता येते. याशिवाय या सायकलबद्दल अनेक खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया.

सायकलची किंमत किती?

ओयूएनसी इलेक्ट्रिक सायकलची लिफ्टिंग क्षमता 120 किलो आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही सायकल चालवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा परवाना आणि नोंदणीचे पालन करावे लागणार नाही. ही सायकल दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीने याच्या बेस व्हेरियंटची किंमत 36,999 रुपये तर टॉप मॉडेलची किंमत 41,999 रुपये ठेवली आहे.

कंपनी या सायकलच्या फ्रेमवर 5 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. म्हणजेच पुढील काही वर्ष तुम्हाला फक्त सायकल चार्ज करावी लागणार आहे. त्याचा वापर गुड्स डिलिव्हरीसाठीही सहज करता येतो. यासाठी सायकलला फ्रंट आणि रिअर प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. यासोबतच वाटेत कुठेतरी बॅटरी संपली तर पेडलनेही चालवू शकता.

एक्स्पोमध्ये ‘या’ कारही लॉन्च

मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पोमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. अर्थात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीचा प्रवेश उशीरा झाला असला तरी कंपनी कोणतीही कसर सोडण्याच्या मनस्थितीत नाही. हे इलेक्ट्रिक वाहन सुरक्षेसाठी 7 एअरबॅग देण्याची तयारी करत आहे. इतकंच नाही तर ड्रायव्हर सीटच्या खाली एअरबॅगही दिली जाऊ शकते ज्यामुळे अपघातादरम्यान गुडघ्याला होणारी इजा टाळण्यास मदत होईल.

वेव ईव्हीए सोलर इलेक्ट्रिक कार वायवे मोबिलिटीने ऑटो एक्स्पोमध्ये एक अशी कार लाँच केली आहे जी ना पेट्रोल, ना डिझेल ना सीएनजी. ही कार सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही मोडवर धावू शकते. भारतीय बाजारात या कारची किंमत 3 लाख 25 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे, या कारबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.