साहित्य-
बटर चिकन- क्रिमी ग्रेव्हीमध्ये शिजवलेले
बासमती तांदूळ
तळलेले कांदे
केशर दूध
तूप
तमालपत्र
वेलची
दालचिनी
लवंगा
जायफळ पावडर
ALSO READ:
कृती-
सर्वात आधी बासमती तांदूळ घेऊन तो अर्धवट शिजवून घ्यावा. आता एका खोल पॅनवर हलके तूप घालून त्यावर बटर चिकन पसरवा. आता त्यावर अर्धवट शिजवलेल्या भाताचा थर ठेवावा. प्रत्येक थरावर तळलेले कांदे, केशरयुक्त दूध आणि तूप घालावे. तसेच वरील सर्व बिर्याणी मसाले घालावे आणि भाताचा दुसरा थर ठेवावा. आता झाकण ठेवून पॅन घट्ट बंद करावा आणि मंद आचेवर काही मिनिटे शिजवून घ्यावे. तर चला तयार आहे आपली बटर चिकन रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik