पुण्यापासून एका दिवसांत पाहून येत येतील अशी भन्नाट ७ ठिकाणे
गोंदेश्वर मंदिर, सिन्नरपुण्यापासून ३ तासात या ठिकाणी पोहोचता येते. बाराव्या शतकात बांधलेले हे पंचायतन प्रकारातील मंदिर महाराष्ट्रातील सर्वात भव्य मंदिर आहे.
नाणेघाट, जुन्नरपुण्यावरून ३ तासात येथे पोहोचता येते. दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेला हा घाट अतिशय देखणा आहे.
संगम माहुली, सातारापुण्यापासून २.५ तासात या ठिकाणी पोहोचता येते . कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर दोन अतिशय देखणी मंदिरे आहेत. अनेक चित्रपटांचे शुटिंग येथे झाले आहे.
नाना फडणीस वाडा, मेणवलीपुण्यापासून २ तासच्या अंतरावर असलेले हे ठिकाण आहे. नाना फडणीस यांचा वाडा, कृष्णेचा घाट असे अनेक देखण्या गोष्टी येथे पाहायला मिळतात.
रायरेश्वर पठार, पुणेपुण्यावरून भोर मार्गावरून २ तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. १६ किमी लांबीच्या या पठारावर सुंदर फुले फुलतात. स्वराज्याची शपत येथे घेतली असे सांगितले जाते. या ठिकाणी कुटुंबाला घेऊन जाऊ शकता.
रणगाडा संग्रहालय, नगरनगर येथील या संग्रहालयात युद्धात वापरलेले अनेक रणगाडे येथे ठेवले आहेत. आणि जवळच निजामशाहीच्या खुणा असलेले महल देखील आहेत.
मल्हारगड, पुणेपुण्यावरून १ तासात दिवे घाट मार्गे येथे जाऊ शकता. स्वराज्यातील सर्वात शेवटी बांधलेला हा किल्ला आहे.
चहासोबत खाण्यासाठी ७ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी स्नॅक्स