Latest Marathi News Updates : नाशिक-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणार
esakal January 23, 2025 03:45 AM
Nashik Live : नाशिक-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणार

नासिक- जयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणार असून नाशिकमधून जयपूरला अवघ्या तीन तासांत पोहोचता येणार आहे.

Mahakumbh Mela Prayagraj LIVE : महाकुंभ मेळ्यात एक लाखाहून अधिक भाविकांना सेवा देण्यासाठी 'इस्कॉन'कडून मेगा किचनचे अनावरण

प्रयागराज, उत्तर प्रदेश : इस्कॉनने महाकुंभ दरम्यान दररोज एक लाखाहून अधिक भाविकांना सेवा देण्यासाठी अत्याधुनिक मेगा किचनचे अनावरण केले. महाकुंभात २० नियुक्त ठिकाणी हे अन्न तयार केले जात असून वितरित केले जात आहे.

Purandar Airport LIVE : पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; उद्या तहसीलवर काढणार मोर्चा

पुणे : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे कंबर कसलीये. शासन प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतानाच ज्या परिसरात प्रकल्प उभारला जाणार आहे, त्या भागातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शासनाने कितीही प्रयत्न केले तरी प्रकल्प पूर्ण होवू देणार नाही, असा निर्धार शेतकर्यांनी केला असून याचाच भाग म्हणून गुरुवारी प्रकल्प अंतर्गत गावातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

MP Milind Deora LIVE : बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशींना हद्दपार करा; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर खासदार मिलिंद देवरा यांची मागणी

बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशींना लवकरात लवकर हद्दपार करा, अशी मागणी शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्यांनी ही मागणी केलीये.

Chhattisgarh News : छत्तीसगडमधील कुलारीघाट भागात सुरक्षा दलांनी १४ माओवाद्यांचा केला खात्मा

ओडिशा : ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कुलारीघाट भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत १४ माओवादी ठार झाले. या संयुक्त कारवाईत ओडिशा पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण यांनी सर्व जवानांचे अभिनंदन केले आहे.

Sharad Pawar LIVE : ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे गुरुवारी (ता. २३) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मीतर्फे आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. व्हाईट आर्मीच्या वतीने पवार यांना ‘आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार’ जाहीर केला आहे. त्याचे वितरण गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये होणार आहे. त्यासाठी पवार यांचे त्या दिवशी दुपारी चार वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते विद्यापीठातील कार्यक्रमास येतील. त्यानंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी दहाच्या सुमारास ते संख (ता. जत) येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.

Sangli LIVE : नशेच्या इंजेक्शनचा साठा सांगलीतून जप्त

Latest Marathi Live Updates 22 January 2025 : भाजप सरकारने राबविलेले प्रत्येक धोरण संविधानविरोधी आहे. सत्तेसाठी संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे, अशी टीका खासदार प्रियांका गांधी यांनी बेळगावात केला. तसेच जागतिक आर्थिक मंचच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) दावोस येथे सुरू असलेल्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध उद्योगसमूहांसोबत तब्बल ४ लाख ९९ हजार ३२१ कोटी रुपयांचे गुंतवणूकविषयक सामंजस्य करार केले. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता.२०) अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांतच विक्रमी संख्येने कार्यादेश जाहीर केले. नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या दीड हजार इंजेक्शनचा साठा सांगली पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या कारवाईत मेफेनटर्माईन नावाचे इंजेक्शन, गोळ्या आणि चारचाकी असा १४ लाख ४६ हजार ६४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. उद्या तहसीलवरती ते मोर्चा काढणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे गुरुवारी (ता. २३) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.