Guillain-Barre syndrome: पुण्यात गुईलेन सिंड्रोमची 22 रूग्ण, जाणून घ्या लक्षण अन् उपाय एका क्लिकवर
esakal January 23, 2025 03:45 AM

recognizing Guillain-Barré Syndrome: पुण्यात गुईलेन सिंड्रोमचे २२ रूग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था अर्लट मोडवर आली आहे.

गुईलेम सिंड्रोम म्हणजे काय?

गुईलेम बॅरे सिंड्रोममुळे नसांवर परिणाम होतो. या आजारामुळे स्नायू कमकुवत होतात तसेच संवेदना कमी होतात. हात,पाय किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. तसेच स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. बोलणे आणि गिळण्यात अडचण आणि डोण्यासंबंधित समस्या निर्माण होतात.

तज्ज्ञांचे मत

गुईलेम बॅरे सिंड्रोमवर अभ्यास करण्यासाठी कमिटी नियुक्त करत आहे. हा आजार नेमका कशामुळे होत आहे यावर अभ्यास करण्यासाठी पाऊले उचलत आहे अशी माहिती डॉ. निना बोराडे , आरोग्य अधिकारी , पुणे पालिका यांनी दिली आहे.

कारणे कोणती?

तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास हा आजार होऊ शकतो.

तसेच कोणतंही व्हायरल इंफेक्शन झाल्यास या आजाराची लागण होऊ शकते.

कोणती काळजी घ्यावी

हात वारंवार स्वच्छ धुवा

ताप तसेच इतर संक्रमित रूग्णांपासून दूर राहा

शरीराची रोगप्रतिशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करा

तुमच्या शरीरात मुंग्या येत असेल किंवा कमकुवतपणा जावत असेल तर डॉक्टरांशी वेळीच संपर्क साधा , घरीच उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.