जळगाव येथे झालेल्या पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या घटनेत झालेल्या जखमींवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून, राज्य सरकारने बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
या दुर्घटनेबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून मृतांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की रेल्वे मंत्रालयाकडून या दुर्घटनेत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असले तरी त्यांनी या घटनेवर लक्ष ठेवले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. महायुती सरकार या कठीण प्रसंगात पीडितांच्या कुटुंबियांसोबत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
Jalgaon Railway Accident Live: जळगाव रेल्वे दुर्घटना ग्रस्तांसाठी मदत तातडीने पुरविण्यात येत आहे - फडणवीसजळगाव रेल्वे दुर्घटनेबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी या दुर्घटनेस जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. याशिवाय आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.
Jalgaon Railway Accident Live: जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यूजळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना धडक दिली. यामध्ये साधारण ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
Live: पचमढीत ८ मित्रदेशांच्या २६ अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात, संवादात्मक शिक्षण पद्धतींचा समावेश- आठ मित्रत्वपूर्ण परदेशी देशांतील 26 अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला आज पचमढी येथील आर्मी एज्युकेशन कॉर्प्स ट्रेनिंग कॉलेज अँड सेंटर. मध्ये सुरुवात झाली
- हे प्रशिक्षण संवादात्मक दृष्टिकोनातून दिले जाणार असून, त्यात सहकार्यात्मक शिक्षण-शिकवण पद्धतींचा समावेश असेल
Solapur Live: बाळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना द्यावे लागते तोंडबाळे परिसरातील संतोष नगरातील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये रस्ता दिवाबत्ती ड्रेनेज मधून येणारी दुर्गंधी भटक्या जनावरांचा त्रास सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास ड्रेनेज मधून येणारे सांडपाणी तसेच पाणी सुटलेल्या दिवशी चिखलाचे साम्राज्य एकंदरीत पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
Live: प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत 1.5 लाख नि-क्षय मित्रांच्या मदतीने 13.37 लाख टीबी रुग्णांची सेवा- राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सुरू करण्यात आलेले, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान क्षयरोगाच्या केअरमध्ये बदल करत आहे.
- 1.5 लाखाहून अधिक नि-क्षय मित्रांद्वारे 13.37 लाख टीबी रुग्णांना मदत केली जात आहे, हा उपक्रम समुदायांना सक्षम बनवत आहे.
Mumbai Live : बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मेळावा घेणार : शिवसेना नेत्या शायना एनसीशिवसेना नेत्या शायना एनसी म्हणाल्या, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी आम्ही वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एक मेळावा घेणार आहोत जिथे आमचे सर्व खासदार, आमदार आणि मंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करतील. एकनाथ शिंदे 24 जानेवारीला त्यांची आभाळ यात्रा सुरू करणार आहेत, ज्यांनी दिलेली कृतज्ञता आहे. केवळ 81 जागा लढवून आम्ही 60 च्या जवळपास आहोत हे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची लोकप्रियता दर्शवते.
जळगावच्या मास्टर कॉलनी परिसरातील अरमान टेन्ट हाऊसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
या आगीमध्ये टेन्ट हाऊस साहित्य जळून लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग कशामुळे लागली याचं कारण नेमकं स्पष्ट झालेलं नाही.
महापालिकेच्या अग्निशमन जवानांकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
या भीषण आगीमुळे धुराचे मोठ्या प्रमाणावर लोट बाहेर पडत असल्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
आगीत झालेल्या लोकसणाची भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
Nashik Live: दारूच्या नशेत बापानेच केला मुलाचा खून- बापलेकाच्या झटापटीत मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने मुलाचा मृत्यू.
- अनिल गुंजाळ असे वीस वर्षीय मुलाचे नाव.
- दोघेही बापलेक दारूच्या नशेत असल्याची माहिती.
- उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील कॅनल रोड भागातील घटना.
- काल रात्री घडलेल्या घटनेनंतर मुलाचा उपचारादरम्यान आज मृत्यू.
- हल्लेखोर बाप विठ्ठल गुंजाळ यास उपनगर पोलिसांनी घेतले ताब्यात.
Mumbai Live: जोगेश्वरी पूर्वाला झोपडपट्टी धारकांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन- मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथे रेल्वेचा हद्दीतील अनधिकृत घरावर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
- स्थानिकांकडून या कारवाईविरोधात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
- तसेच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.
Mumbai Live: जोगेश्वरीत पोलिसांवर जमावाची दगडफेकमुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला रेल्वेचा हद्दीतील अनधिकृत घरावर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असता त्यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
Sambhaji Nagar Live : शहरात आता २३ मजली टॉवर दिसणार; उंच इमारतींना महापालिकेची मंजुरीछत्रपती संभाजीनगर शहरात आता २३ मजली उंच इमारत दिसणार आहेत. नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात ७० मीटर उंचीपर्यंतच्या इमारती बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाने शहानूरवाडी भागात तब्बल २३ मजली इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे. यापूर्वी शहरात १५ मजली उंच इमारत पडेगाव भागात उभारण्यात आली होती. आता शहानूरवाडी भागातील २३ मजली इमारतीत सर्वांत उंच ठरणार आहे. शहरात गगनचुंबी इमारती उभारती उभ्या राहाव्यात यासाठी शासनाने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार ७० मीटर उंच म्हणजे २३ मजल्यांपर्यंत इमारती उभारल्या जाऊ शकतात, मात्र आतापर्यंत १५ मजले एवढी एकच उंच इमारत बांधण्यात आलेली आहे. दहा ते बारा मजल्यांच्या इमारती अनेक भागांत झाल्या आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांनी दोन वर्षांपूर्वी २२ मजल्यांपर्यंतच्या इमारतींना बांधकाम परवानगी मागितली होती, पण पुढे हा प्रस्ताव बारगळला होता. आता मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात गगनचुंबी इमारती दिसून येतील.
Sabhajinagar: आत्मदहनाचा इशारा देताच हसूल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखलछत्रपती संभाजीनगरमध्ये पद आणि कायद्याचा गैरवापर करून सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अंकुश दौड यांनी एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण केली होती. पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा इशारा देताच हसूल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Kalyan Live: कल्याण आणि भांडुप परिमंडलात 9 महिन्यांत 9 हजार 257 वीजचोरांवर कारवाईछत्रपती संभाजीनगरमध्ये पद आणि कायद्याचा गैरवापर करून सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अंकुश दौड यांनी एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण केली होती. पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा इशारा देताच हसूल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra Live: दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर राज्यात जन्म दाखल्यांचा घोटाळादिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर राज्यात जन्म दाखल्यांचा घोटाळा
- उशिरा जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्र देण्याचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी राज्य सरकारने केले स्थगित
- राज्याच्या महसुल विभागाने काल म्हणजे २१ जानेवारीला या संदर्भातील आदेश केला जारी
- गैरप्रकारांच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारचा उशिरा जन्म - मृत्यु दाखले देण्याचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांचे आधिकार स्थगित करण्याचा मोठा निर्णय
Dombivali: कल्याण आणि भांडुप परिमंडलात 9 महिन्यांत 9 हजार 257 वीजचोरांवर कारवाईवीजचोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलाने धडक कारवाई केली आहे. गेल्या 9 महिन्यांत 9 हजार 257 जणांविरुद्ध कारवाई करत महावितरणने 46 कोटी 78 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरीची देयके न भरणाऱ्या 906 ग्राहकांवर महावितरणतर्फे थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोन्ही परिमंडलात 880 जणांविरुद कारवाई करून 5 कोटी 7 लाख रुपयांचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आणण्यात आला आहे.
Pune: मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची चोरी.मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची चोरी.
व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना विमाननगर भागात घडली.
याप्रकरणी नीतेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune: अजित पवारांशी संबंधित खाजगी कारखान्याला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पहिल्या क्रमांकाचा पुरस्कारवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सकाळी अकरा वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार , सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह साखर उद्योगातील इतर नेते उपस्थित असणार आहेत.
Live : संदीप क्षिरसागर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटराष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट..
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अजित पवारांचे केले अभिनंदन. .
MIDC चा विकास व्हावा जेणेकरून बीड शहरात अधिकाधिक उद्योग यावेत व त्यातून रोजगार निर्मिती होऊन जिल्हा विकासाचा वाटेवर यावा, याबाबत पवारांकडे केल्या मागण्या.
Live : वाल्मिक कराडला CPAP मशीन वापरण्यास कोर्टाची मंजुरीवाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहात ठेवणार..
आजची रात्र ही बीड जिल्हा कारागृहात असणार
मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या बीड की हर्सूल कारागृहात ठेवायचं ? यावर अधिकाऱ्यांमध्ये विचार विनिमय सुरू
Live : पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणीसरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मराठा समाज आंदोलकांनी केली आहे.
Mumbai Live: मुंबई मेट्रो मार्ग- 4 वडाळा - कासारवडावलीच्या स्थापत्य काम खर्चात 1274.80 कोटींची लक्षणीय वाढमुंबई मेट्रो मार्ग-4 (वडाळा - कासारवडवली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल 1274.80 कोटी रुपयांची वाढ आणि 5 वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.
PM Modi Live Updates: बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला १० वर्ष पूर्णबेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला १० वर्ष पूर्ण. हा एक परिवर्तनकारी, लोकसक्षम उपक्रम बनला आहे आणि जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांचा यात सहभाग आहे - पंतप्रधान.
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे नवीन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची घेतली भेट आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत झाले सहभागी.
Saif Ali khan Live: सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीची पुन्हा चौकशीसैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याची पुन्हा कसून चौकशी केली जाणार आहे.
Ulhasnagar Live : उल्हासनगरमध्ये एक बांग्लादेशी महिला ताब्यात, पोलिसांची कारवाईउल्हासनगर पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले असून, तिला आसरा देणाऱ्या लोकांवर देखील कारवाई केली जाणार आहे.
Samrudhhi Mahamarg Live : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू 5 जखमीसमृद्धी महामार्गावर कार दुभाजकाला धडकून एक जणाचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
Raj Thackeray Live : राज ठाकरेंचा तीन दिवसीय नाशिक दौरामनसे प्रमुख राज ठाकरे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अॅक्टिव्ह झाले आहेत. ते गुरुवारपासून तीन नाशिक मुक्कामी असणार आहेत.
Nashik Live : नाशिक-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणारनासिक- जयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणार असून नाशिकमधून जयपूरला अवघ्या तीन तासांत पोहोचता येणार आहे.
Mahakumbh Mela Prayagraj LIVE : महाकुंभ मेळ्यात एक लाखाहून अधिक भाविकांना सेवा देण्यासाठी 'इस्कॉन'कडून मेगा किचनचे अनावरणप्रयागराज, उत्तर प्रदेश : इस्कॉनने महाकुंभ दरम्यान दररोज एक लाखाहून अधिक भाविकांना सेवा देण्यासाठी अत्याधुनिक मेगा किचनचे अनावरण केले. महाकुंभात २० नियुक्त ठिकाणी हे अन्न तयार केले जात असून वितरित केले जात आहे.
पुणे : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे कंबर कसलीये. शासन प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतानाच ज्या परिसरात प्रकल्प उभारला जाणार आहे, त्या भागातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शासनाने कितीही प्रयत्न केले तरी प्रकल्प पूर्ण होवू देणार नाही, असा निर्धार शेतकर्यांनी केला असून याचाच भाग म्हणून गुरुवारी प्रकल्प अंतर्गत गावातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
MP Milind Deora LIVE : बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशींना हद्दपार करा; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर खासदार मिलिंद देवरा यांची मागणीबेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशींना लवकरात लवकर हद्दपार करा, अशी मागणी शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्यांनी ही मागणी केलीये.
ओडिशा : ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कुलारीघाट भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत १४ माओवादी ठार झाले. या संयुक्त कारवाईत ओडिशा पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण यांनी सर्व जवानांचे अभिनंदन केले आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे गुरुवारी (ता. २३) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मीतर्फे आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. व्हाईट आर्मीच्या वतीने पवार यांना ‘आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार’ जाहीर केला आहे. त्याचे वितरण गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये होणार आहे. त्यासाठी पवार यांचे त्या दिवशी दुपारी चार वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते विद्यापीठातील कार्यक्रमास येतील. त्यानंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी दहाच्या सुमारास ते संख (ता. जत) येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.
Sangli LIVE : नशेच्या इंजेक्शनचा साठा सांगलीतून जप्तLatest Marathi Live Updates 22 January 2025 : भाजप सरकारने राबविलेले प्रत्येक धोरण संविधानविरोधी आहे. सत्तेसाठी संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे, अशी टीका खासदार प्रियांका गांधी यांनी बेळगावात केला. तसेच जागतिक आर्थिक मंचच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) दावोस येथे सुरू असलेल्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध उद्योगसमूहांसोबत तब्बल ४ लाख ९९ हजार ३२१ कोटी रुपयांचे गुंतवणूकविषयक सामंजस्य करार केले. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता.२०) अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांतच विक्रमी संख्येने कार्यादेश जाहीर केले. नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या दीड हजार इंजेक्शनचा साठा सांगली पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या कारवाईत मेफेनटर्माईन नावाचे इंजेक्शन, गोळ्या आणि चारचाकी असा १४ लाख ४६ हजार ६४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. उद्या तहसीलवरती ते मोर्चा काढणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे गुरुवारी (ता. २३) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..