Kalyan Police : डोंबिवलीत गांजा तस्करी करताना एकजण ताब्यात; कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई
Saam TV January 23, 2025 01:45 AM

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण- डोंबिवलीत नशेचा धंदा करणाऱ्या आणि नशेखोरांविरोधात पोलिसांनी फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे. यात गेल्या महिनाभरापासून डीसीपी स्कॉटला सातत्याने गांजा तस्कर अंमली पदार्थ विकणाऱ्या विरोधात तसेच नशेखोरांविरोधात कारवाई सुरू केली आहे. डीसीपी स्कॉडने डोंबिवली पश्चिम परिसरातून एका गांजा तस्करला बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे नशेखोरांचे धाबे दणाणले आहे. 

- डोंबिवलीमध्ये झालेल्या कारवाईत लीलाधर ठाकर असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून त्याच्याजवळून सुमारे तीन किलो गांजा जप्त केला. दरम्यान कल्याण डीसीपी स्कॉडला डोंबिवली पश्चिमेकडून सिद्धार्थ नगर ऐश्वर्या हॉटेलजवळ एक इसम गांजा विकत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी स्कॉडच्या पथकाने सिद्धार्थ नगर परिसरात सापळा रचला. गांजा विक्री करणाऱ्या इसमाला अटक केली. 

तीन किलो गांजा जप्त

लीलाधर ठाकर असे या इसमाचे नाव असून तो पश्चिम कोपर क्रॉस रोड सिद्धार्थनगर परिसरात राहणार आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी सुमारे तीन किलो गांजा जप्त केला. या गांजा विक्री करणाऱ्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? या प्रकरणी कडून आणखी तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच गांजा विरोधात कारवाई आणखी सुरू असून हि कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांजा विक्री 

गांजा विक्री करणारा तरुण हा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत असून त्याच्या विरोधात याआधी देखील असे गुन्हे आहेत का?, तसेच  हा गांजा त्याने कुठून आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.