Rashmika Mandanna: 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी लागलेलं असूनही एका पायावर उड्या मारत आली रश्मिका, नेटकऱ्यांनी केलं कौतुक
esakal January 23, 2025 04:45 AM

Rashmika Mandanna: विक्की कौशल याचा 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील विक्की आणि अक्षय खन्नाचा दमदार अभिनयामुळे चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. हा ट्रेलरचं लॉन्चिंग मुंबईच्या दादरमधल्या प्लाझा सिनेमामध्ये करण्यात आलं होतं. या ट्रेलर लॉन्चिंगला चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती लावली.

चित्रपटाच्या लॉन्चिंगवेळी अभिनेता विक्की कौशल, , तसंच चित्रपटातील इतर कलाकराही उपस्थित होते. सध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. तर अक्षय खन्ना हा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर चाहत्यांना आता चित्रपट प्रदर्शनाची ओढ लागली आहे.

या ट्रेलरच्या लॉन्चिंग सोहळ्यासाठी रश्मिका मंदाना देखील उपस्थित होती. रश्मिकाच्या पायाला दुखापत झाल्यानं ती एका पायावर चालताना दिसत होती. तिने एका पायावर चालत सिनेमागृहात प्रवेश केला. दरम्यान रश्मिकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रश्मिकाला पायाला दुखापत

हिच्या पायाला दुखापत झाली आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना तिच्या पायाला लागलं होतं. दरम्यान तिला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला होता. आता रश्मिकाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दरम्यान रश्मिकाने 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगला उपस्थिती लावली. लाल रंगातील ड्रेसमध्ये रश्मिका अतिशय सुंदर दिसत होती. परंतु पायाला दुखापत झाल्यानं रश्मिकाला एका पायावर चालत यावं लागलं आहे. सध्या तिचा एका पायावर चालताना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार चित्रपट

विक्की कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा चित्रपत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत. तर रश्मिका येसूबाई यांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.