मुंबई : कंटेंट क्रिएशन आणि प्रोडक्शन कंपनी इन्स्पायर फिल्म्स लिमिटेडने १:१० च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने २१ जानेवारी रोजी इन्स्पायर फिल्म्सच्या स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली. दरम्यान, गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
अधिकृत भांडवल दुप्पट वाढत्या व्यवसायामुळे वाढत्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने तिचे अधिकृत भांडवल १५ कोटींवरून ३० कोटींपर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, गुरुवारी एनएसईवर हा शेअर्स ५.४३ टक्के घसरून २७ रुपयांवर आला. इन्स्पायर फिल्म्सचे शेअर्स तीन महिन्यांत १२ टक्क्यांपेक्षा जास्त आणि एका वर्षात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत.
१० शेअर्समध्ये विभाजन इन्स्पायर फिल्म्स संचालक मंडळाने एका शेअरचे १० शेअर्समध्ये विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. इन्स्पायर फिल्म्सच्या शेअर्सच्या विभाजनामागील कारण म्हणजे शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सची तरलता सुधारणे आणि ते लहान किरकोळ भागधारकांना परवडणारे बनवणे, असे कंपनीने म्हटले आहे.
रेकॉर्ड तारीखएन्स्पायर फिल्म्सच्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पोस्टल मतपत्रिकेद्वारे भागधारकांची मान्यता मिळाल्यानंतर रेकॉर्ड तारीखनिश्चित केली जाईल आणि योग्य वेळी स्टॉक एक्सचेंजला कळवले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.