Sakal Drawing Competition : 'सकाळ एनआयई' चित्रकला स्पर्धेस राज्यभरातून प्रतिसाद; २७ जानेवारीपर्यंत नोंदणीची शेवटची संधी
esakal January 24, 2025 05:45 AM

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ चित्रकला स्पर्धेस राज्यभरातून शाळा, विद्यार्थी, पालक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यंदा ‘सकाळ एनआयई’ चित्रकला स्पर्धा २ फेब्रुवारीला एकाच दिवशी राज्यातील विविध केंद्रांवर होणार आहे. यंदाची स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठीही खुली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे १९८५ पासून गेली ३९ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून, यंदा स्पर्धेचे ४० वे वर्ष आहे. ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेत आतापर्यंत कोट्यवधी विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून, २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे.

स्वरूप

‘सकाळ - चित्रकला’ स्पर्धा पूर्णतः विनामूल्य असून, स्पर्धा एकूण सहा गटांत घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाइन) होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.

स्पर्धेविषयी...

  • ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही

  • कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमांचे बंधन नाही

  • चित्र कोणत्याही रंग साहित्याने रंगवू शकता

  • स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे दिला जाईल

  • ऑफलाइन स्पर्धा केंद्रांचे तपशील आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ऑनलाइन स्पर्धेबाबतची माहिती दैनिक ‘सकाळ’मधून वेळोवेळी प्रसिद्ध केली जात आहे.

दिव्यांग, विशेष विद्यार्थ्यांनासुद्धा संधी

राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, आदिवासी एकात्मिक प्रकल्प संचालित आश्रम शाळा, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग शाळांमधील विद्यार्थीसुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रमुख शहरातील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर व rahul.garad@esakal.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

ऑनलाइन स्पर्धेत असे व्हा सहभागी

(महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी)

‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक ओपन करून स्पर्धेसाठी नोंदणी करावी. chitrakala.sakalnie.in स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ माध्यम समूहाद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून शालेय मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ - चित्रकला स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते. मागील काही वर्षांपासून राज्यभरातील विशेष, दिव्यांग आणि आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा स्पर्धेत सहभागाची संधी दैनिक ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिली. त्यामुळे दिव्यांग आणि विशेष मुलांनादेखील स्पर्धेत सहभागी होता आले.

- शिवानी सुतार, मुख्याध्यापिका, अपंग कल्याणकारी संस्था, वानवडी, पुणे

दरवर्षी ‘सकाळ’तर्फे प्राथमिक, माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात येते. मागील काही वर्षांपासून ही स्पर्धा महाविद्यालयीन युवकांसाठी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील सुरू केली आहे. समाजातील सर्व स्तरातील घटकांना सहभागी करून घेणारी ‘सकाळ - चित्रकला’ स्पर्धा ही एकमेव स्पर्धा आहे.’

- रोहिणी काळे, मुख्याध्यापिका, मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे

स्पर्धेचे गट व वेळ

(प्रत्यक्ष ऑफलाइन स्पर्धा)

‘अ’ गट - पहिली व दुसरी

‘ब’ गट - तिसरी व चौथी

वेळ :- सकाळी ११ ते १२.३०

‘क’ गट - पाचवी ते सातवी

‘ड’ गट - आठवी ते दहावी

वेळ :- सकाळी ९ ते १०

ऑनलाइन स्पर्धा

‘इ’ गट - सर्व प्रकारच्या विद्याशाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी

‘फ’ गट - पालक व ज्येष्ठ नागरिक

वेळ :- स्पर्धेच्या दिवशी

सकाळी ९ ते सायं. ७ या वेळेत चित्र अपलोड करता येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.