भागधारकांना मिळणार माेठा लाभांश, घोषणेनंतर शेअर्सची उसळी, 'ही' आहे रेकॉर्ड तारीख
ET Marathi January 24, 2025 12:45 PM
मुंबई : एमपीएस लिमिटेडने २३ जानेवारी रोजी आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकालासह कंपनीने आपल्या भागधारकांसाठी लाभांश देण्याची ही घाेषणा केली. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यानंतर शेअर्समध्ये थाेडी घसरण झाली. दिवसाअखेरीस एमपीएस लिमिटेडचा शेअर्स १९१.६० रुपयांनी वाढून २,२०० रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल ३,७११ कोटी रुपयांपर्यंत वाढले. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,४६९.९५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक १,३१५.२० रुपये आहे. लाभांशरे रेकॉर्ड तारीखएमपीएस लिमिटेडने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० दर्शनी मूल्याच्या शेअरसाठी ३३ रुपयांचा पहिला अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख २९ जानेवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत त्यांना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी लाभांश दिला जाईल. यापूर्वी, कंपनीने ऑगस्ट २०२४ मध्ये ४५ रुपयांचा अंतिम लाभांश जारी केला होता. निव्वळ नफा वाढला डिसेंबर २०२४ तिमाही मध्ये एमपीएस लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा ३७ टक्क्यांनी वाढून ४०.७१ रुपये कोटी झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत नफा २९.७३ कोटी रुपये होता. कंपनीचा ऑपरेटिंग नफा ६०.३४ कोटी रुपयांवर पोहोचला. तर करपूर्व नफा ५३.३१ कोटी रुपये झाला आहे. करपूर्व नफा ३५.८६ टक्के वाढला आहे. शेअर्सचा परतावागेल्या एका महिन्यात एमपीएसच्या शेअर्समध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ६ महिन्यांत शेअर्सने ७ टक्के परतावा दिला आहे.एका वर्षात गुंतवणूकदारांना ४५ टक्के नफा मिळाला आहे. त्याच वेळी गेल्या ५ वर्षांत शेअर्सने ३५१ टक्के नफा दिला आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.