रणजी ट्रॉफीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने तब्बल 1 दशकानंतर कमबॅक केलं. मुंबईतच होणाऱ्या सामन्यामुळे रोहितकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर रणजी ट्रॉफीत दणक्यात सुरुवात करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र रोहित त्याच्या तुलनेत नवख्या खेळाडूंसमोर अपयशी ठरला आहे. जम्मू काश्मिरविरुद्धच्या सामन्यात रोहित पहिल्या डावात 3 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे रोहित दुसऱ्या डावात पलटवार करत टीकाकारांना बॅटने उत्तर देईल, अशी आशा होती. रोहितने तशी सुरुवातही केली, मात्र जम्मू-काश्मिरच्या खेळाडूने अफलातून कॅच घेत रोहितच्या खेळीला पूर्णविराम लावला.
यशस्वी आणि रोहित या दोघांनी दुसऱ्या डावात अप्रतिम सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर 14 व्या ओव्हरमध्ये ही जोडी फुटली. युद्धवीर सिंह याने 14 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रोहित शर्माला आऊट केलं. आबिद मुश्ताक याने कमाल कॅच घेतला आणि रोहितला मैदानाबाहेर जाण्यास भाग पाडलं. रोहितने 35 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्ससह 28 रन्स केल्या.
रोहितला त्याआधी पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रोहितने पहिल्या डावात 19 बॉलमध्ये 3 रन्स केल्या. उमर नझीर याने रोहितला कॅप्टन पारस डोगरा याच्या हाती कॅच आऊट केलं.
रोहित शर्मा आऊट
जम्मू-काश्मिरने पहिल्या डावात 86 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. जम्मू-काश्मिरने मुंबईला 33.2 ओव्हरमध्ये 120 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर जेकेने प्रत्युत्तरात 46.3 षटकांमध्ये सर्वबाद 206 धावा केल्या. जम्मू काश्मिरसाठी शुबमन खजुरिया याने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून मोहित अवस्थी याने 5 विकेट्स घेतल्या.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि कर्ष कोठारी.
जम्मू-काश्मीर प्लेइंग ईलेव्हन : पारस डोगरा (कॅप्टन), शुभम खजूरिया, विवरांत शर्मा, अब्दुल समद, कन्हय्या वधावन (विकेटकीपर), औकिब नबी डार, यावर हसन, युद्धवीर सिंह चरक, आबिद मुश्ताक, उमर नझीर मीर आणि वंशज शर्मा.