केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी (ता. २४) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात ते महापूजा करतील. त्यानंतर अजंग वडेल (ता. मालेगाव) येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हेही शहा यांच्याबरोबर असतील. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
Bhandara News : भंडाऱ्याच्या जवाहरलाल येथील कारखान्यात भीषण स्फोटभंडाऱ्याच्या जवाहरलाल येथील आयुध निर्माण कारखान्यात स्फोट. स्फोट एवढा मोठा होता की त्या कंपनीची पूर्ण इमारत स्फोटात उद्धवस्त.
Transportation Travel Expensive: राज्यात वाहन प्रवास महागलाराज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तिकीट दरवाढीला मंजूरी. एसटीची भाडेदरवाढ आजपासून लागू होणार. रिक्षा आणि टॅक्सीचाही प्रवास महागणार. रिक्षाचं किमान भाडे 23 रूपयांवरून 26 रूपये तर टॅक्सीचं किमान भाडे 28 रूपयांवरून 31 रूपये अशी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
Supriya Sule live: देवेंद्र फडणवीस हे एकटेच काम करताहेत"महायुतीचं सरकार येऊन आज 60 दिवस झाले. मात्र वन मॅन शो काम होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच काम करीत आहेत. बाकीचे कोण कुठं फिरत आहे, परदेशात फिरत मला माहीत नाही," असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या कोल्हापुरात माध्यमाशी बोलत होत्या.
Raj Thackeray live: राज ठाकरे आजच नाशिकहून मुंबईला रवाना होणारNashik News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे.ते आजच मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. काल (गुरुवारी) राज ठाकरे नाशिमध्ये आले होतो. काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते आज मुंबईकडे होणार रवाना होतील असे समजते.
Sharad Pawar Live: काका-पुतण्यामध्ये काय चर्चा झाली.....राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गुरुवारी एकाच व्यासपीठावर बसले होते. कार्यक्रमानंतर काका- पुतण्यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला. अजित पवार यांच्या सोबत एका प्रकल्पाबाबत चर्चा झाली, असे शरद पवार म्हणाले. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
Dharashiv Shivsena : धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताच्या निमित्ताने धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो गायब झाला आहे. जिल्हाप्रमुख सुरज सोळुंके यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून सांवत यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तर माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे बॅनरवर फोटो आहेत. तर काल मुंबईतील शिवसेना मेळाव्याला तानाजी सावंत यांची गैरहजेरीची चर्चा रंगली होती त्यात आता या बॅनरबाजीमुळे शिंदेसेनेतील अंतगर्त वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
Yogi Adityanath : CM योगी दिल्लीत 14 सभा घेणारपूर्व आणि उत्तर दिल्लीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेणार असल्याची माहिती आहे. ते मुस्लिम बहुल क्षेत्रात या सभा घेणार असल्याची माहिती असून ज्या भागात दंगली झाल्या त्या भागात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी हिंदू फायर ब्रँड अशी ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
Amit Shah : अमित शाह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणारकेंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ते दर्शनासाठी जाणार आहे. मालेगावमधील सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. तर आजच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे शहांसोबत उपस्थित राहणार आहेत.