दावोसमध्ये अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चुकीचा लावला आहे. काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन त्यांना भेटी घाटी घ्यायच्या होत्या असे आदित्य ठाकरे म्हणाले. बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता असे ठाकरे म्हणाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला आणि त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत होतो. त्यांच्या विभागाचे करार मुख्यमंत्र्यांनी केले. नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला, त्यांना निमंत्रण होतं कीं नाही? त्यांना सोबत का नेलं नाही? ती नाराजी आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याची टीका आदित्य ठाकतरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
SRA आणि रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टला सुद्धा पुढच्या वेळेस दावोसला घेऊन जातील असं कळतंय. टेंडर काढून काम द्या काही ठिकाणी तुम्ही थेट करार करताय असेही ठाकरे म्हणाले. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योग मंत्री पोहचायला हवेत. पण ते मुख्यमंत्र्यांच्या नंतर गेले होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून उशीरा निघाले का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. उद्योग मंत्री यांचा असा काय कार्यक्रम होता जे तिथे थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? मुख्यमंत्री सगळे काम सोडून तिथे थांबता होते, मात्र उद्योगमंत्री का थांबू शकत नाहीत? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला. मागील दोन वर्षापासून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे ठाकरे म्हणाले.
अधिक पाहा..