अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' (Sky Force) चित्रपट 24 जानेवारीला रिलीज झाला आहे. नवीन वर्षात अक्षय कुमारचा हा दमदार पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच वीर वीर पहारिया पाहायला मिळत आहे. यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'स्काय फोर्स' हा चित्रपट 160 कोटींच्या बजेटमध्ये बनवा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला प्रदर्शित झालेल्या 'स्काय फोर्स' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कुमारचा 'स्काय फोर्स' रिलीज होऊन आता फक्त दोन दिवस झाले आहेत. दोन दिवसात या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 'स्काय फोर्स' ने पहिल्या दिवशी 11.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 21.50 कोटींची कमाई केली. दोन दिवसात चित्रपटाने (Box Office Collection Day 2) 33.75 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर '' धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटातून वीर पहारिया याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा पहारिया (Veer Pahariya ) नातू आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटाला पार्श्वभूमी देशभक्ती आहे. भारत-पाकिस्तान हल्ल्याची कथा यात सांगण्यात आली आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटात बॉलिवूडचा अभिनेत्री सारा अली खान देखील आहे.
'स्काय फोर्स' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar ) आणि वीर पहाडियासोबत सारा अली खान आणि निरमत कौर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. स्काय फोर्सची कथा 1965 झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे.