IND vs ENG : कॅप्टन सूर्यकुमार विजयानंतर आनंदी, क्रेडिट देताना खेळाडूंचं नावच सांगितलं
GH News February 01, 2025 10:07 AM

टीम इंडियाने चौथ्या टी 20I सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी मात करत पुण्यात मालिका विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 19.4 ओव्हरमध्ये 166 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी एकतर्फी आघाडी घेतली. टीम इंडियाचा हा मायदेशातील सलग 17 वा टी 20I मालिका विजय ठरला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अशाप्रकारे नववर्षात पहिलीवहिली आणि टी 20I मालिका जिंकली. टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडूंचं नाव घेत त्यांचं कौतुक केलं.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

“सर्वांनी चांगले प्रयत्न केले. तसेच चाहत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावणं फार वाईट होतं. हार्दिक आणि शिवम दुबे या दोघांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर शानदार बॅटिंग केली. आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. मला माहित होतं की आम्ही पावरप्लेनंतर सामन्यावर नियंत्रण मिळवू. आम्ही काही विकेट्स गमावले. ड्रिंक्सनंतर हर्षित राणा याने तिसऱ्या गोलंदाजाच्या रुपात अप्रतिम कामगिरी केली”, असं सूर्याने नमूद केलं.

सामन्याचा धावता आढावा

इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांच्या प्रत्येकी 53 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला 166 धावांवर रोखलं. टीम इंडियाकडून कनकशन सब्स्टीट्यूट असलेल्या हर्षित राणा आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत इंग्लंडची कंबर मोडली. तर वरुण चक्रवर्थी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अर्शदीप सिंह याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

टीम इंडियाचा मालिका विजय, कॅप्टन सूर्याचा जल्लोष

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा (कनकशन सब्स्टीट्यूट)

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.