Income Tax Calculator Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार किंवा सरकार येत्या वर्षभरात कोणत्या योजना राबवणार यासंदर्भात घोषणा केल्या जातात. अर्थसंकल्पातील महत्त्वाची बाब म्हणजे प्राप्तिकराच्या मर्यादेसंदर्भातील घोषणा होय. अर्थंसकल्पातून प्राप्तिकराच्या रचनेत काही बदलांबाबत घोषणा केली जाते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. प्रामुख्यानं मध्यमवर्गाला यामध्ये विशेष रस असतो. सध्या प्राप्तिकरदात्यांना दोन पर्यांयांपैकी एका पर्यायाची निवड करावी लागते. न्यू टॅक्स रिजीमकडे जवळपास 72 टक्के करदाते वळले आहेत. तर, ओल्ड टॅक्स रिजीममध्ये 28 टक्के प्राप्तिकरदाते आहेत. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास किती कर द्यावा लागेल हे जाणून घेणार आहोत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्राप्तिकरासंदर्भात काय घोषणा करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात घोषणा झाल्यास त्या 2025-26 या आर्थिक वर्षापासून लागू होतील. जर प्राप्तिकरासंदर्भात काही बदल केले गेले नाहीत तर न्यू टॅक्स रिजीममध्ये किती कर भरावा लागेल, हे जाणून घेऊया. न्यू टॅक्स रिजीमचा पर्याय ज्या प्राप्तिकरदात्यांनी निवडला आहे. त्यांचं 7 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. 75 हजारांच्या स्टँडर्ड डिड्कशन शिवाय मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट मिळत नाही उदा. घरभाडे, एलआयसी किंवा पोस्टाच्या योजनांमधील गुंतवणूक, पीएफ योगदान, गृहकर्जावरील व्याज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च अशी कोणतीही सूट न्यू टॅक्स रिजीममध्ये मिळत नाही.
आपण नव्या कररचनेत 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंत एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असल्यास त्याला किती कर द्यावा लागेल हे जाणून घेणार आहोत.
एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 10 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 700001 ते 10 लाखांच्या दरम्यान असतो. शिक्षण आणि आरोग्य सेससह एकूण 44200 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल.
एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 20 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 1925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 1500001 पेक्षा अधिक असा लागू होतो. शिक्षण आणि आरोग्य सेससह एकूण 278199 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल.
एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 30 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 2925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 1500001 पेक्षा अधिक असा लागू होतो.शिक्षण आणि आरोग्य सेससह एकूण 590199 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल.
एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 40 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 3925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 1500001 पेक्षा अधिक असा लागू होतो. शिक्षण आणि आरोग्य सेससह एकूण 902199 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल.
एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 50 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 4925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 1500001 पेक्षा अधिक असा लागू होतो. शिक्षण आणि आरोग्य सेससह एकूण 1214199 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल.
इतर बातम्या :
Union Budget 2025 : यंदा अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला काय मिळणार? नेमक्या अपेक्षा काय?
अधिक पाहा..