नागपुरात एक वराला लग्नापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. प्रेयसीची फसवणूक करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. लकड़गंज पोलिसांनी त्याला अटक करुन शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असून त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे.
ALSO READ:
आरोपी प्रेयसीची फसवणूक करुन दुसऱ्या मुलीशी लग्न करत असल्याची माहिती प्रेयसीला मिळाली. तिने लग्न मांडपात हळदी समारंभात येऊन गोंधळ घातला. प्रेयसीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पडोळे नगर जयभीम चौकात राहणारे दिनेश हे एका कंपनीत काम करतात. त्यांचे एका 25 वर्षीय तरुणी सोबत 13 -14 वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले. प्रेयसीने तिला वारंवार लग्न करण्याचे म्हटले. पण तो लग्न करायचे टाळायचा.
ALSO READ:
दरम्यान दिनेशच्या घराबाहेर पंडाल लावल्याची माहिती प्रेयसीला लागली. पण घरात वाढदिवस असल्याचे त्याने प्रेयसीला सांगितले. तिने सत्यता जाणून घेण्यासाठी मैत्रीणीला पाठविले. तिथे गेल्यावर दिनेशची हळद असल्याचे समजले. प्रेयसीला हे समजल्यावर तिने हळदी समारंभात पोहोचून गोंधळ घातला.ALSO READ:
माहिती मिळताच नंदनवन पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दिनेशच्या विरुद्ध लकडग़ंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 2 दिवसांची पोलिस कोठड़ी सुनावण्यात आली आहे.Edited By - Priya Dixit